इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला एकहाती नमवण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावातील 176 धावांनंतर स्टोक्सनं दुसऱ्या डावात सलामीला येताना नाबाद 78 धावा चोपल्या. शिवाय त्यानं 3 विकेट्स घेत इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत विंडीजवर 113 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. स्टोक्सला या कामगिरीचे फळ मिळालं आणि 14 वर्षांनंतर ICC Rankingमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं मानाचं स्थान पटकावलं.
स्टोक्सनं ICC च्या कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये विंडीज कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. अँड्य्रू फ्लिंटॉफ याच्यानंतर अव्वल स्थानावर विराजमान होणार स्टोक्स हा इंग्लंडचा पहिलाच अष्टपैलू खेळाडू आहे. 2006मध्ये फ्लिंटॉफनं ही कामगिरी केली होती. शिवाय स्टोक्सनं कसोटी फलंदाजांत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. स्टोक्सनं अष्टपैलू खेळाडूंमध्ये होल्डरची 18 महिन्यांची मक्तेदारी मोडली. बेन स्टोक्स 497 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. 2008मध्ये जॅक कॅलिसनं 517 गुणांसह अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर स्टोक्सनं सर्वाधिक गुणांची कमाई केली आहे. भारताचा रवींद्र जडेजा ( 397) आणि आर अश्विन ( 281) अनुक्रमे तिसऱ्या व पाचव्या स्थानी कायम आहेत.
फलंदाजांमध्ये स्टोक्सनं 6 स्थानांच्या सुधारणेसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनला मागे टाकले आहे. स्टीव्ह स्मिथ ( 911) आणि विराट कोहली ( 886) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. स्टोक्सच्या खात्यात 827 गुण आहेत. भारताचा चेतेश्वर पुजारा ( 766) आणि अजिंक्य रहाणे ( 726) एका स्थानाच्या घसरणेसह अनुक्रमे 8 व्या व 10 व्या क्रमांकावर आहेत.
पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज
आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम!
Big News : सहा महिन्यांत दोन वेळा रंगणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर
सौरव गांगुलीची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली; टीम इंडियाला करावी लागणार 'ही' गोष्ट!
ICCच्या निर्णयानं 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये बदल; 36 वर्षांनी जुळून येईल योगायोग