ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान

भारताने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:23 PM2022-12-28T17:23:56+5:302022-12-28T17:25:17+5:30

whatsapp join usJoin us
ICC Test Ranking R Ashwin Shreyas Iyer climbs up Virat Kohli Cheteshwar Pujara drops places IND vs BAN test | ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान

ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

R Ashwin Shreyas Iyer, ICC Test Ranking: भारतीय संघाने बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. वन डे मालिकेत अनपेक्षित २-१ असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियाने हिशेब चुकता केला. पहिला कसोटी सामना भारताने जिंकलाच होता. दुसऱ्या सामन्यात शेवटच्या डावात भारताला १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताची अवस्था ७ बाद ७४ झाली होती. पण आर अश्विन आणि श्रेयस अय्यर जोडीने ७१ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला सामना जिंकवून दिला. आर अश्विनने दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. त्याने पहिल्या डावात ४ बळी टिपले तर दुसऱ्या डावात २ बळी टिपले. अश्विन आणि श्रेयस अय्यर दोघेही विजयाचे शिल्पकार ठरले. त्यामुळेच त्यांना कसोटी क्रमावारीत फायदा झाला.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करून भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले. मीरपूर कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरलेल्या आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत फायदा झाला. दुसऱ्या सामन्यात सहा बळी घेणारा अश्विन जसप्रीत बुमराहसह गोलंदाजांमध्ये संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला. अश्विनने त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद ४२ धावा केल्या. ज्याच्या मदतीने तो फलंदाजांच्या क्रमवारीत ८४व्या स्थानावर पोहोचला.

अश्विनसोबत ७१ धावांची नाबाद भागीदारी करणारा अय्यर करिअरमधील सर्वोत्तम १६व्या क्रमांकावर पोहोचला. अय्यरने पहिल्या कसोटीत ८६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अय्यर या वर्षी भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. प्लेअर ऑफ द सिरीज असूनही चेतेश्वर पुजारा तीन स्थानांनी घसरून १९व्या स्थानावर आहे, तर विराट कोहली दोन स्थानांनी घसरून १४व्या स्थानावर पोहोचला आहे. या मालिकेत कोहलीची बॅट चालली नाही. फलंदाजांमध्ये ऋषभ पंत सहाव्या तर गोलंदाजांमध्ये उमेश यादव ३३व्या स्थानावर आहे.

बांगलादेशचा फलंदाज लिटन दास कारकिर्दीतील सर्वोत्तम १२व्या क्रमांकावर पोहोचला आहे तर मोमिनुल हक ६८व्या, झाकीर हसन ७०व्या आणि नुरुल हसन ९३व्या स्थानावर आहे. फिरकीपटू तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी दोन स्थानांचा फायदा झाला असून ते २८व्या आणि २९व्या स्थानावर आहेत.

Web Title: ICC Test Ranking R Ashwin Shreyas Iyer climbs up Virat Kohli Cheteshwar Pujara drops places IND vs BAN test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.