ICC Test Rankings: ICC ची मोठी चूक; टीम इंडियाने गमावला नंबर-1 चा किताब, ऑस्ट्रेलिया पुन्हा टॉपवर

Team India ICC Ranking: आयसीसीच्या तांत्रिक चुकीमुळे टीम इंडियाला कसोटीमध्ये नंबर-1 संघ घोषित करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:24 PM2023-02-15T20:24:30+5:302023-02-15T20:25:18+5:30

whatsapp join usJoin us
ICC Test Rankings: Big mistake by ICC; Team India lost number-1 title, Australia on top | ICC Test Rankings: ICC ची मोठी चूक; टीम इंडियाने गमावला नंबर-1 चा किताब, ऑस्ट्रेलिया पुन्हा टॉपवर

ICC Test Rankings: ICC ची मोठी चूक; टीम इंडियाने गमावला नंबर-1 चा किताब, ऑस्ट्रेलिया पुन्हा टॉपवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India ICC Ranking: भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर बुधवारी दुपारी टीम इंडिया कसोटीमध्ये नंबर-1 संघ ठरला. टीम इंडियाला 115 रेटिंग गुण मिळाले होते. मात्र काही तासांनंतर संघ पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ICC च्या तांत्रिक चुकीमुळे हे घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, टीम इंडिया वनडे आणि टी-20 मध्ये अव्वल स्थानावर आहे.

आयसीसीने बुधवारी क्रमवारी जाहीर केली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ 111 रेटिंगसह पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर आला होता, मात्र सायंकाळी उशिरा त्यांनी त्यात पुन्हा बदल केला. यानुसार ऑस्ट्रेलियाचा संघ 126 गुणांसह पहिल्या तर टीम इंडिया 115 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वीही आयसीसीने अशीच चूक केली होती. इंग्लंड 107 गुणांसह तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका 1025 गुणांसह चौथ्या तर न्यूझीलंड 99 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

सहाव्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ
आयसीसी क्रमवारीत इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान 88 गुणांसह सहाव्या, श्रीलंका 88 गुणांसह सातव्या, वेस्ट इंडिज 78 गुणांसह आठव्या, बांगलादेश 46 गुणांसह नवव्या आणि झिम्बाब्वे 27 गुणांसह 10व्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका देखील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील 4 पैकी 3 सामने जिंकले तर तो थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

महिन्याभरात दुसरी चूक
सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे रँकिंगमध्ये चूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. मागच्या महिन्यातच आयसीसीने नेमकी हीच चूक करुन टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनवले होते. त्यावेळीही आयसीसीने 2 तासांत बदल करुन परिस्थिती निवळली होती. मात्र, असे असतानाही टीम इंडियाला प्रथम क्रमांक मिळवण्याची संधी आहे आणि त्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकावी लागेल.

Web Title: ICC Test Rankings: Big mistake by ICC; Team India lost number-1 title, Australia on top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.