इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावेल का?; विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ही मालिका जिंकून टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी आहे. न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानी फेकले आणि टीम इंडियाला मागे सोडून थेट अव्वल स्थानी झेप घेतली. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचा ऑस्ट्रेलियाला फटका बसला. मुंबई इंडियन्सच्या माजी फलंदाजाची तुफान फटकेबाजी; ९ चेंडूंत कुटल्या ५० धावा!
भारताला अव्वल स्थान पटकावण्यासाठी इंग्लंडवर मोठा विजय मिळवाला लागेल. न्यूझीलंडची पुढील कसोटी मालिका जून महिन्यात इंग्लंडविरुद्ध आहे आणि त्यामुळे टीम इंडियाला घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करून अव्वल स्थान पटकावण्याची आयती संधी आहे.कांगारूचा केक का कापला नाही?; अजिंक्य रहाणेचं उत्तर ऐकून त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला
टीम इंडिया अव्वल स्थानावर कशी पोहचू शकते?
- टीम इंडियानं ही मालिका १-०नं जिंकल्यास - ११९ गुण
- टीम इंडियानं ही मालिका २-०नं जिंकल्यास - १२० गुण
- टीम इंडियानं ही मालिका ३-०नं जिंकल्यास - १२२ गुण
- टीम इंडियानं ही मालिका ४-०नं जिंकल्यास - १२३ गुण
- टीम इंडियानं ही मालिका २-१ नं जिंकल्यास - ११९ गुण
- टीम इंडियानं ही मालिका ३-१नं जिंकल्यास - १२० गुण
भारतानं ही मालिका अनिर्णीत राखल्यास किंवा इंग्लंडने ही मालिका जिंकल्यास विराट कोहली अँड टीमला अव्वल स्थानापासून दूर रहावे लागेल. Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा
भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुसरा कसोटी सामनाही येथेच होईल. त्यानंतर तिसरा व चौथा कसोटी सामना २४ फेब्रुवारी व ४ मार्च या तारखेपासून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र सामना असेल.
कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होईल, हे सामने अनुक्रमे १२, १४, १६, १८ व २० मार्चला अहमदाबाद येथेच होती. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल होतील. हे सामने २३, २६ व २८ मार्चला खेळवले जातील.
पहिल्या दोन कसोटींसाठीचा भारत व इंग्लंडचा संघ ( squad for the first two Test matches against England) भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर; नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार; राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.
इंग्लंड - जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, जेम्स ब्रॅसी, मेसोन क्रॅन, साकिद महमूद, मॅट पर्किसन, ऑली रॉबीन्सन, अमर विर्दी.