महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) उत्तराधिकारी म्हणून टीम इंडियात स्थान पटकावणाऱ्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) सुरुवातीच्या काही सामन्यांत साजेशी कामगिरी करता आली नाही. रिषभच्या कामगिरीत प्रत्येकजण धोनीला शोधत असल्यानं दिल्लीच्या २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजावर सुरुवातीला प्रचंड दडपणही दिसले. पण, संधी मिळत गेल्या अन् त्यानं कामगिरीत सुधारणाही केली. आता तर त्यानं अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला, की जो १५ वर्षांत धोनीला जमला नाही. धोनीलाच काय तर भारताच्या एकाही यष्टिरक्षक-फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही. दोन आठवड्यांपूर्वीच सांगितलं होतं, लोकांचा जीव महत्त्वाचा; स्थगितीच्या निर्णयावर शोएब अख्तरची प्रतिक्रीया
आयसीसीनं बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात रिषभनं टॉप टेनमध्ये प्रवेश केला. पंतनं मागील ७-९ महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभ पंतनं उल्लेखनीय कामगिरी करताना टीम इंडियाकडे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली. त्यानंतर भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याची बॅट चांगली तळपली. त्याचाच फायदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याला झाला. रिषभनं टॉप टेन फलंदाजांमध्ये प्रवेश करताना विराट कोहली ( ५) व रोहित शर्मा ( ६) यांच्या पंक्तित स्थान पटकावले. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप टेन मध्ये प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. अनेक विक्रम नावावर असलेल्या महेंद्रसिंग धोनीला १९ व्या क्रमांकापर्यंत मजल मारता आली होती. रिषभ संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहे. रोहित व न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स हेही सहाव्या स्थानावर आहेत. या तिघांच्याही खात्यात ७४७ गुण आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी BCCI करणार चार्टर्ड फ्लाईटची सोय; द. आफ्रिकेच्या खेळाडूंना मिळालं ग्रीन सिग्नल!
भारताचा कर्णधार विराट कोहली ८१४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. रोहितनं सहावे स्थान पटकावून कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रमवारी पटकावली. रिषभनं २० कसोटी सामन्यांत ४५.२६च्या सरासरीनं १३५८ धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ९व्या स्थानी गेला असून डेव्हिड वॉर्नर १०व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन हे अव्वल तीन क्रमांकावर आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रुट चौथ्या क्रमांकावर आहे.