ICC Test Rankings : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील फ्लॉपशोमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडगोळीला मोठा फटका बसला आहे. आयसीसीच्या क्रमवारीत रोहित कसा बसा टॉप टेनमध्ये टिकलाय. पण विराट थेट टॉप १० च्या बाहेर फेकला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत यशस्वी जैस्वालनं एका स्थानाने सुधारणा करत टॉप ५ मध्ये एन्ट्री केली आहे. युवा सलामीवीर ७१५१ रेटिंग पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. सध्याच्या घडीला तो कसोटीत सर्वोच्च रँकिंगवर असणारा भारतीय फलंदाज आहे.
पंतची कमाल, बेस्ट कमबॅकसह घेतली मोठी झेप
कमबॅक कसोटी सामन्यात शतकी तोरा दाखवून देणाऱ्या विकेट किपर बॅटर रिषभ पंतनंही टॉप १० मध्ये एन्ट्री मारली आहे. चेन्नई कसोटीतील पहिल्या डाव ३७ धावांची खेळी करणाऱ्या पंतनं दुसऱ्या डावात १०९ धावांची खेळी केली होती. दमदार कमबॅकसह रिषभ पंत ७५१ रेटिंगसह सहाव्या स्थानावर विराजमान झाला आहे.
रोहितची पाच स्थानांनी घसरण, विराट टॉप १० च्या बाहेर
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात अपयश आले. त्यामुळे त्याच्या कसोटी क्रमवारीत ५ स्थानांनी घसरण झाली असून तो ७१६ गुणांसह १० व्या स्थानावर पोहचला आहे. विराट कोहली ७०९ गुणांसह १२ व्या स्थानावर आहे.
जो रुट टॉपला कायम!
कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट अव्वलस्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात ८९९ गुण आहेत. न्यूझीलंडच्या केन विलियम्सन (८५२ रेटिंग) दुसऱ्या, डॅरेल मिचेल ७६० रेटिंगसह तिसऱ्या आणि स्टीव्ह स्मिथ ७५७ रेटिंगस चौथ्या स्थानावर आहे.
Web Title: ICC Test Rankings Yashasvi Jaiswal Into Top 5 Rishabh P Top 10 Virat Kohli And Rohit Sharma Suffered Loss
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.