ICC Test team of the year 2023: आयसीसीने जाहीर केलेल्या २०२३ च्या वन डे व ट्वेंटी-२० संघात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसले, परंतु कसोटी संघात फक्त दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि त्यामुळे २०२३च्या सर्वोत्तम कसोटी संघात त्यांचेच वर्चस्व पाहायला मिळतेय. याही संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे सोपवले गेले आहे.
कसोटी संघात ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा ( १२१० धावा), श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने ( ६०८), न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( ६९५) हे आघाडीची फळी सांभाळतील. इंग्लंडचा जो रूट व ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड मधल्या फळीत आहेत. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा व आर अश्विन या संघात आहेत. सलग तिसऱ्या वर्षी आयसीसीच्या कसोटी संघात स्थान पटकावणारा आर अश्विन हा पहिला भारतीय ठरला आहे.
आयसीसीचा २०२३ मधील सर्वोत्तम कसोटी संघ - उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विलियम्सन, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जडेजा, एलेक्स केरी, पॅट कमिन्स ( कर्णधार), आर अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड