आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) सदस्यांची आज अहमदाबाद येथे बैठक पार पडली आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) च्या निलंबनाच्या निर्णयावर मोठा निर्णय घेतला गेला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाची ( SLC) बाजू ऐकल्यानंतर, ICC बोर्डाने निर्णय घेतला की श्रीलंका संघ द्विपक्षीय क्रिकेट आणि ICC स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकतात. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आयसीसीने SLC वर सरकारी हस्तक्षेपाचा आरोप करून निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, SLC चा निधी ICC द्वारे नियंत्रित केला जाईल आणि ICC बोर्डाने हेही स्पष्ट केले की की श्रीलंका यापुढे आयसीसी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचे २०२४ आयोजन करणार नाही, तो आता दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.
खेळाच्या भागधारकांशी ९ महिन्यांच्या सल्लामसलत प्रक्रियेनंतर ICC बोर्डाने आंतरराष्ट्रीय खेळासाठी नवीन जेंडर पात्रता नियमांना देखील मान्यता दिली. महिलांच्या खेळाच्या अखंडतेचे संरक्षण, सुरक्षितता, निष्पक्षता हे नवीन धोरण या तत्त्वांवर आधारीत आहे. डॉ पीटर हार्कोर्ट यांच्या अध्यक्षतेखालील ICC वैद्यकीय सल्लागार समितीच्या नेतृत्वाखालील पुनरावलोकन, केवळ आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटसाठी लिंग पात्रतेशी संबंधित आहे, तर देशांतर्गत स्तरावर लिंग पात्रता ही प्रत्येक वैयक्तिक सदस्य मंडळाची बाब आहे, ज्यावर स्थानिक कायद्याने परिणाम होऊ शकतो. दोन वर्षांत या नियमांचे पुनरावलोकन केले जाईल.
चीफ एक्झिक्युटिव्हज कमिटेड (CEC) ने महिला सामना अधिकार्यांच्या विकासाला गती देण्याच्या योजनेला मान्यता दिली ज्यामध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटमधील ICC पंचांसाठी समान दिवसाचे वेतन समाविष्ट आहे आणि जानेवारी २०२४ पासून प्रत्येक ICC महिला चॅम्पियनशिप मालिकेत एक तटस्थ पंच असल्याचे सुनिश्चित करणे समाविष्ट आहे.
नवा नियम CEC ने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या वन डे आणि ट्वेंटी-२०क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर Stop Clock नियम लागू करण्यास सहमती दर्शवली. षटकांदरम्यान लागणारा वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. जर गोलंदाजी संघ मागील षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंदात पुढील षटक टाकण्यास तयार नसेल आणि असे तीनवेळा झाल्यास त्या संघाला ५ धावांची पेनल्टी होईल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये षटकांसाठीच्या वेळेची मर्यादा टिकावी यासाठी हा निर्णय आहे. प्रायोगिक तत्वावर हा नियम असेल.