ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २४५ धावांवर गडगडलानौमन अली ( Nauman Ali) आणि यासीर शाह ( Yasir Shah) यांनी दुसऱ्या डावात अनुक्रमे ५ व ४ विकेट्स घेतल्या
पाकिस्तान क्रिकेट संघानं कराची येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याच्या दिशेनं कूच केली आहे. आफ्रिकेचा दुसरा डाव २४५ धावांवर गडगडल्यानं पाकिस्तानसमोर विजयासाठी ८८ धावांचं माफक लक्ष्य राहिले आहे.पाकिस्तानसमोर ८८ धावांचे लक्ष्य आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) पाकिस्तानी फलंदाज हसन अली ( Hasan Ali) याला ट्रोल करत जाहीर वाभाडे काढले.
एडन मार्कराम ( ७४), रॅसी व्हेन डेर ड्युसेन ( ६४) आणि टेम्बा बवुमा ( ४०) हे वगळता आफ्रिकेचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर त्यांनी नांग्या टाकल्या. नौमन अली ( Nauman Ali) आणि यासीर शाह ( Yasir Shah) यांनी दुसऱ्या डावात अनुक्रमे ५ व ४ विकेट्स घेत पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. नौमननं ३५ धावांत ५ विकेट्स घेत इतिहास रचला. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हसन अली पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि त्यातही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. ३४ व्या वर्षी कसोटी संघात पदार्पण; पाकिस्तानी गोलंदाजानं केला ७२ वर्षांत कुणालाच न जमलेला पराक्रम!
आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात हसन अलीला १४ षटकांत केवळ एक विकेट घेता आली. पण, फलंदाजीत त्यानं ३३ चेंडूंत २१ धावांचं योगदान दिलं. हसननं दोन खणखणीत चौकार खेचले आणि तो आणखी धावा कुटेल असे वाटत होते. मात्र, कागिसो रबाडानं १०९व्या षटकात हसन अलीचा त्रिफळा उडवला. रबाडाची ही कसोटीतील २००वी विकेट ठरली. या विकेटवरून ICCनं हसन अलीला ट्रोल केलं. ICCनं त्यांच्या सोशल मीडियावर हसन अलीचे दोन फोटो पोस्ट केले. एक फोटो निम्मा होता, तर दुसरा पूर्ण होता. त्यावरून खेळाडू सोशल मीडियावर प्रोफाईल फोटो असा ठेवतात, परंतु प्रत्यक्षात तो फोटो असा असतो, अशी कॅप्शन ICCनं दिली. चार बोटांनी बॅट पकडून केली फलंदाजी; ऑसी गोलंदाजांच्या माऱ्याचा चेतेश्वर पुजारानं असा केला सामना!
२०१९मध्ये खराब कामगिरीमुळे हसन अलीला संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये एका मोसमात ४३ विकेट्स घेत राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं.
Web Title: ICC trolls Pakistan’s Hasan Ali after being cleaned up by Kagiso Rabada
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.