आयसीसी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. चार वेळचा विश्वविजेता भारतीय संघ उपांत्य लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात बाजी मारुन सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य राहील. दोन्ही संघ उपांत्य फेरीपर्यंतच्या वाटचालीमध्ये अपराजित आहेत. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला.
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान हे 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत 9 वेळा समोरासमोर आले आहेत.
1988 - शाहिद अन्वर ( 43) आणि इंझमाम-उल-हक ( 39) यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं 7 बाद 194 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 39.3 षटकांत 126 धावांवर गडगडला. पाकिस्ताननं 68 धावांनी विजय मिळवला.
1998 - कर्णधार अमित पगणीसच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 189 धावांचा यशस्वी पाठलाग केला. अमित भंडारी आणि रीतींदर सिंग सोढी यांनी गोलंदाजीत कमाल दाखवताना मिळून सात विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानचा डाव 188 धावांववर गुंडाळला. पगणीसं 38 धावा केल्या आणि मोहम्मद कैफनं अर्धशतकी खेळी केली.
2002 - सुपर लीगच्या त्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताला 48.5 षटकांत 181 धावा करता आल्या, प्रत्युत्तरात पाकचा कर्णधार सलमान बटनं 85 धावांची नाबाद खेळी करून विजय निश्चित केला.
2004 - पाकिस्ताननं उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला. टीम इंडियानं ठेवलेले 170 धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं सहज पार केले. फवाद आलम आणि तारीक महमूद यांनी 88 धावांची विजयी भागीदारी केली.
2006 - चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश असलेल्या टीम इंडियाला पाकिस्ताननं पराभूत केलं होतं. पियुष चावलानं चार विकेट्स आणि जडेजानं तीन विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव 109 धावांवर गुंडाळला होता. पण, भारताचे सहहा फलंदाज अवघ्या 3.2 षटकांत 9 धावांवर माघारी परतले होते. पियुष चावलानं 71 धावांची खेळी केली, परंतु पाकनं 38 धावांनी सामना जिंकला.
2010 - पुन्हा एकदा पाकिस्ताननं बाजी मारली. पावसाच्या व्यत्ययात खेळवल्या गेलेल्या त्या सामन्यात भारतानं 23 षटकांत 9 बाद 114 धावा केल्या. पाकिस्ताननं हा सामना दोन विकेट्स राखून जिंकला.
2012 - उन्मुक्त चंदचा नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या लढतीत 137 धावांचा पाठलाग करताना भारतानं 8 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. बाबा अपराजीथनं अर्धशतक झळकावून भारताला 1 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
2014 - सर्फराज खान आणि संजू सॅमसन यांच्या अर्धशतकी खेळी करताना भारताला 262 धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 222 धावाच करू शकला.
2018 - गतविजेत्या भारताने 2018 च्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला 203 धावांनी लोळवले होते.
NZ vs IND : रोहितची माघार; सलामीला नवी जोडी येणार? कोहलीनं सांगितले अंतिम अकरा शिलेदार
NZ vs IND : यॉर्कर किंग Jasprit Bumrahनं घेतली बॉलिवूडच्या 'Hot' अभिनेत्रीची विकेट
NZ vs IND : रोहितपाठोपाठ कर्णधाराचीही माघार, पहिल्या दोन सामन्यांना मुकणार
IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश