पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. यजमान दक्षिण आफ्रिका पहिल्याचा सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. आफ्रिकेनं 1998 मध्ये वर्ल्ड कप आणि 2014मध्ये चॅम्पियन्स चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. 17 जानेवारी 2020 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 16 संघाची चार गटात विभागणी करण्यात आली असून 9 फेब्रुवारीला अंतिम सामना होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींना दोन विविध गटात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड पहिल्याच सामन्या जपानचा सामना करणार आहे. जपान आयसीसीच्या स्पर्धेत पदार्पण करत आहे. तर गतविजेता भारतीय संघ श्रीलंकेच्या सामन्यांनं जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करेल. भारतीय संघाने चारवेळा जेतेपद पटकावले आहे, तर ऑस्ट्रेलियानं तीन, पाकिस्ताननं दोन आणि इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी एकवेळा जेतेपद पटकावले आहे.
गटवार विभागणी
A - भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान
B - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया
C - पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड
D - अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा
Web Title: ICC U19 Cricket World Cup 2020 schedule announced, Team India in A Group
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.