Join us

ICC U19 Womens T20 World Cup : सेमीत भारतासमोर या संघाचं आव्हान; कधी अन् कुठं रंगणार सामना?

भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून फक्त दोन पावलं दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 22:31 IST

Open in App

U19 Womens T20 World Cup, India Women U19 vs England Women U19 Semi Final 1 : मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगला आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून भारतीय संघाने एकही सामना न गमावता सेमी फायल गाठलीये. गत विजेता भारतीय संघ पहिल्या सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा स्पर्धेत गाजवण्यासाठी मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात भारतीय संघासमोर कोणत्या संघाचं आव्हान असेल? हा सामना कधी अन् कुठं खेळवण्यात येईल? यासंदर्भातील माहिती

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारत-इंग्लंड यांच्यात रंगणार सेमी फायनलची लढत सुपर सिक्स लढतीत १५० धावांनी दमदार विजय मिळवत भारतीय संघानं सेमीच तिकीट मिळवलं. आता टीम इंडियासमोर इंग्लडच्या संघाचे आव्हान असेल. या दोन्ही संघातील लढत ३१ जानेवारीला क्वालालंपूरच्या बायुएमास ओव्हल, स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

भारतीय संघाच्या बाजूनं आहे रेकॉर्ड

यंदाच्या अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी २०२३ मध्ये भारत आणि इंग्लंड महिला अंडर १९ संघात लढत पाहायला मिळाली होती. या सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला होता. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या इंग्लंड संघाला भारतीय संघानं अवघ्या ६८ धावांत ऑलआउट केले होते. त्यानंतर १४ षटकात ७ गडी राखून भारतीय संघानं सामना जिंकला होता.

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये  ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सीन

आयसीसी महिला अंडर १९ टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी लढत पाहायला मिळाले. हा सामना देखील ३१ जानेवारीलाच खेळवण्यात येईल. ही लढत पहिल्या सेमी फायनलनंतर दुपारी १२ वाजता सुरु होईल. दोन्ही संघातील विजेते संघ २ फेब्रुवारीला याच मैदानावर फायनल खेळतील. हा सामना दुपारी १२ वाजता सुरु होईल.

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध इंग्लंड