ICC WC 2023 Qualifier : स्कॉटलंडचा १ विकेट राखून थरारक विजय; सातव्या क्रमांकावर आला अन् आयर्लंडचा बाजा वाजवला

ICC WC 2023 Qualifier : भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी सुरू आहे. काल आयर्लंडला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 09:23 AM2023-06-22T09:23:12+5:302023-06-22T09:30:10+5:30

whatsapp join usJoin us
ICC WC 2023 Qualifier : Chasing 287 runs against Ireland, team was 152/7 then MICHAEL LEASK arrived and smashed 91*(61), SCOTLAND won the game by just 1 wicket | ICC WC 2023 Qualifier : स्कॉटलंडचा १ विकेट राखून थरारक विजय; सातव्या क्रमांकावर आला अन् आयर्लंडचा बाजा वाजवला

ICC WC 2023 Qualifier : स्कॉटलंडचा १ विकेट राखून थरारक विजय; सातव्या क्रमांकावर आला अन् आयर्लंडचा बाजा वाजवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC WC 2023 Qualifier : भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी सुरू आहे. काल आयर्लंडला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात आयर्लंडचा ओमानकडून पराभव झाला होता आणि काल स्कॉटलंडने थरारक विजयाची नोंद केली. कर्टीस कॅम्फेरच्या ( Curtis Campher) १२० धावांच्या जोरावर आयर्लंडने २८६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंडचे ७ फलंदाज १५२ धावांवर तंबूत परतले होते. पण, ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मायकेल लेस्कने ( Michael Leask) ६१ चेंडूंत ९१ धावांची धडाकेबाज खेळी करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. स्कॉटलंडने ५० षटकांत ९ गडी गमावून २८९ धावा केल्या.


नाणेफेक जिंकल्यानंतर स्कॉटलंडने बुलावायो येथे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडचा निम्मा संघ ७० धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर कर्टीसने सहाव्या विकेटसाठी जॉर्ज डॉकरेलसोबत १३६ धावांची भागीदारी केली. फलकावर २०६ धावा असताना डॉकरेल ( ६९) बाद झाला. कर्टीसने दमदार खेळ सुरू ठेवताना १०८ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह १२० धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर आयर्लंडने ८ बाद २८६ धावा उभ्या केल्या. स्कॉटलंडच्या ब्रेंडन मॅक्मुलनने ३४ धावांत ५ फलंदाज बाद केले.  

Image
२८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या आणि एका टप्प्यावर त्यांचे सात फलंदाज १५२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते. पण, लेस्कने स्कॉटलंडचा डाव सांभाळला आणि मार्क वॅटसोबत आठव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. मार्कने ४३ चेंडूत ७ चौकारांसह ४७ धावा केल्या. सफायान शरीफने ( ६ धावा) मायकेलसोबत नवव्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली. मायकेलच्या ६१ चेंडूत ९ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ९१ धावांच्या खेळीच्या बळावर स्कॉटलंडने १ विकेट राखून ही मॅच जिंकली.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: ICC WC 2023 Qualifier : Chasing 287 runs against Ireland, team was 152/7 then MICHAEL LEASK arrived and smashed 91*(61), SCOTLAND won the game by just 1 wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.