लंडन : स्टिंग आॅपरेशनद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंग आणि पिच फिक्सिंग होत असल्याचा दावा नुकताच करण्यात आला. या आरोपातील तथ्य जाणून घेण्यासाठी आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषद सखोल चौकशी सुरू करेल. दावा करणाऱ्या वाहिनीच्या प्रतिनिधींची भेट घेऊ. आरोपांकडे मुळीच डोळेझाक होणार नसल्याची ग्वाही आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी दिली.कतार येथील अल्-जझिरा वाहिनीने भारत, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया तसेच इंग्लंड यांच्या सामन्यांत मॅच फिक्सर्सच्या चिथावणीवरून पिच तयार करण्यात आली होती, असा दावा केला आहे. ज्या सामन्यांवर संशय घेण्यात आला त्यांत भारत विरुद्ध श्रीलंका (गाले, २६ ते २९ जुलै २०१७), भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया (रांची १६ ते २० मार्च २०१७) आणि भारत विरुद्ध इंग्लंड (चेन्नई १६ ते २० डिसेंबर २०१६) या सामन्यांचा समावेश आहे.आयसीसीने आरोपांचा तपास सुरू करताना, ती वाहिनी स्टिंगमधील फुटेजची देवाणघेवाण करण्यास नकार देत असल्याचे म्हटले होते. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डांनीदेखील असाच दावा केला. त्यामुळे आयसीसी सीईओ रिचर्डसन हे लकवरच अल्-जझिराच्या अधिकाºयांची भेट घेणार आहेत. आंतरराष्टÑीय क्रिकेटपटूंना टार्गेट बनविणे अतिशय कठीण असल्याचे सांगून रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘‘लहान स्तरावर टी-२० लीगचे आयोजन करणारे आणि सामन्यांचे टीव्हीवर प्रक्षेपण होत असेल, तर आयोजक नियमानुसार वागतात का? हे तपासून पाहावे लागेल. भ्रष्टाचारविरोधी पथक, खेळाडूंची जागरूकता, फ्रेंचायसी मालक आणि स्पर्धेसोबत असलेल्या लोकांवर करडी नजर ठेवणे आदी कामे आयसीसीला करावीच लागतील.’’क्रिकेटमधील डोपिंगबाबत विचारताच ते म्हणाले, ‘‘खेळाडूंना शक्तिवर्धक औषधे घेण्याची गरज पडेल, असा आमचा खेळ नाही. तथापि, क्रिकेटला स्वच्छ व पारदर्शी ठेवण्यासाठी वाडाच्या नियमांचे आम्ही पालन करणार आहोत. क्रिकेटमध्ये टी-२०ची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. डोपिंगच्या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठीच डोपिंग परीक्षणदेखील वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.’’लोकांनी क्रिकेटमधील फिक्सिंगबाबत भाष्य केले, की माझ्या चिंतेत भर पडते. नंतर आयसीसी डोळेझाक करते किंवा असे काही घडलेच नाही, असे दर्शवीत असल्याचा आरोप होतो, तेव्हा अधिक त्रास होतो. त्यामुळेच पुढील दोन दिवसांत अल्-जझिराच्या प्रतिनिधींना भेटून तपास सुरू करू.लहान स्तरावर आयोजित होणाºयाटी-२० लीगमध्ये भ्रष्टाचारहोऊ शकतो.- डेव्ह रिचर्डसन
- Cricket Buzz»
- बातम्या»
- फिक्सिंगच्या आरोपांची पाळेमुळे शोधून काढू, आयसीसी आरोपांकडे डोळेझाक करणार नाही
फिक्सिंगच्या आरोपांची पाळेमुळे शोधून काढू, आयसीसी आरोपांकडे डोळेझाक करणार नाही
स्टिंग आॅपरेशनद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंग आणि पिच फिक्सिंग होत असल्याचा दावा नुकताच करण्यात आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 2:44 AM