ICC Women World Cup 2022 : Smriti Mandhana - भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार ओपनर स्मृती मानधना हिच्या डोक्यावर उसळी घेतलेला चेंडू आदळला होता. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे आणि तेथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात स्मृतीच्या डोक्यावर एक उसळता चेंडू आदळला. त्यामुळे तिला त्वरित मैदान सोडावे लागले होते. सामन्याच्या सुरुवातीलाच स्मृती शबनीम इस्माईलच्या उसळत्या चेंडूवर जखमी झाली. त्यानंतर तिला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. बाऊन्सर चेंडू लागल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून ती फलंदाजी करण्यासाठी फिट असल्याचे सांगितले मात्र अजून एका सल्ल्यानंतर ती रिटायर्ड हर्ट झाली. तिच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स बीसीसीआयने दिले आहेत.
मेडिकल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार तिच्यामध्ये कनकशनची लक्षणे दिसून आली नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून तिने सामना अर्ध्यावरून सोडला. या सामन्यात भारतीय संघाने ५० षटकांमध्ये ९ बाद २४४ धावा केल्या. भारताकडून हरमनप्रीत सिंहने शानदार शकती खेळी केली. तिने ११४ चेंडूत १०३ धावा फटकावल्या. भारताने दोन धावांनी हा सराव सामना जिंकला होता. स्मृती दुखापतीतून सावरली असल्याचे बीसीसीआयने सांगितले. तिच्या प्रकृतीवर वैद्यकिय टीम लक्ष ठेऊन आहे आणि पुढील सामन्यातील सहभागाचा निर्णय नंतर घेतला जाईल.
भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना ६ मार्चला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे आणि तोपर्यंत स्मृती बरी होईल.
भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक६ मार्च - वि. पाकिस्तान१० मार्च - वि. न्यूझीलंड१२ मार्च - वि. वेस्ट इंडिज१६ मार्च - वि. इंग्लंड१९ मार्च - वि. ऑस्ट्रेलिया२२ मार्च - वि. बांगलादेश २७ मार्च - वि. दक्षिण आफ्रिका
भारतीय संघ - मिताली राज ( कर्णधार), हरमनप्रीत कौर ( उप कर्णधार) , स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटीया ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव