ICC Womens T20 WC 2023 - महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची उपांत्य फेरीची लढत आज होणार आहे. भारतीय महिलासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे आणि त्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur )सह तीन खेळाडू काल संध्याकाळी उपचारासाठी दवाखान्यात गेल्या होत्या आणि आजच्या सामन्यात त्यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. हरमनप्रीत कौरशिवाय गोलंदाज पूजा वस्त्राकर हे नावही समोर येत आहे. दोघी खेळाडू आजारी पडल्या आहेत आणि आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल.
दोन्ही खेळाडू आजच्या सामन्यान न खेळल्यास तो भारतासाठी मोठा धक्का असेल. डावखुरी फिरकीपटू राधा यादव हिच्या फिटनेसवरही शंका आहे. हरमनप्रीत कौर न खेळल्यास स्मृती मानधना नेतृत्व करताना दिसेल. ऑस्ट्रेलिया सलग तिसरा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. हरमनप्रीतच्या जागी हर्लीन देओलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. हरमनप्रीतने चार सामन्यांत केवळ ६६ धावाच केल्या आहेत, परंतु महत्त्वाच्या सामन्यात तिचे असणे प्रतिस्पर्धींवर दडपण निर्माण करण्यासारखे आहे. पूजा वस्त्राकरने आतापर्यंत या स्पर्धेत दोन विकेट्स घेतल्या आहेत, परंतु रेणुका सिंगसह तिने प्रतिस्पर्धींची डोकेदुखी वाढवून ठेवलेली दिसली.
भारतीय महिला संघ : यस्तिका भाटिया, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (क), रिचा घोष (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, स्मृती मानधना, शिखा पांडे, देविका वैद्य, अंजली सरवाणी.
ऑस्ट्रेलिया महिला संघ: मेग लॅनिंग (सी), अॅलिसा हिली (व्हीसी), डी'आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट , अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"