सिडनी : 2020 मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. प्रथमच पुरुष व महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.
स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलिया समोर भारतीय महिलांचे आव्हान असणार आहे. 21 फेब्रुवारीला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल आठ संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत आणि उर्वरीत दोन स्थानांसाठी पात्रता स्पर्धा होणार आहे. 2019 च्या अखेरच्या टप्प्यात पात्रता स्पर्धा घेण्यात येइल.
भारतीय महिलांना A गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर चारवेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. शिवाय या गटात न्यूझीलंड व श्रीलंका हे तगडे संघही आहेत. एक संघ पात्रता फेरीनंतर ठरणार आहे. भारताने 2009, 2010 आणि 2018 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आता अपेक्षांचे ओझे वाढल्यामुळे यावेळी त्यांना आणखी मोठी झेप घ्यावी लागणार आहे.
गटवारी A गट
ऑस्ट्रेलिया ( 2010, 2012, 2014, 2018 चॅम्पियन्स)
भारत
न्यूझीलंड
श्रीलंका
पात्रता फेरीतील संघ
B गट
इंग्लंड ( 2009 चॅम्पियन्स)
वेस्ट इंडिज ( 2016 चॅम्पियन्स )
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
पात्रता फेरीतील संघ
पूर्ण वेळापत्रकासाठी क्लिक करा
https://www.icc-cricket.com/t20-world-cup/womens-fixtures
Web Title: ICC Women’s T20 World Cup 2020 : India take on defending champions Australia at Sydney Showground Stadium on 21 February 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.