Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'

पाकिस्तानी महिला संघाला अगदी थोडक्यात आटोपलं होतं. पण अल्प धावसंख्येचा पाठलाग करणं काही लंकेला जमलं नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 11:58 PM2024-10-03T23:58:08+5:302024-10-03T23:59:55+5:30

whatsapp join usJoin us
ICC Womens T20 World Cup, 2024 2nd Match Fatima Sana Shine With Bat And Ball Pakistan Women won by 31 runs Against Sri Lanka Women | Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'

Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानी संघाने कॅप्टन फतिमा सनाच्या (Fatima Sana) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात धमाकेदार विजयाने केली आहे.  प्रबोधनी (Prabodhani), सुगंधिका कुमारी(Sugandika Kumari) आणि श्रीलंकन महिला संघाची कर्णधार चामरी अट्टापटू (Chamari Athapaththu) या तिघींनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत पाकिस्तानी महिला संघाला अगदी थोडक्यात आटोपलं होतं. पण अल्प धावसंख्येचा पाठलाग करणं काही लंकेला जमलं नाही. 

पाकिस्तानी महिला संघाची विजयी सलामी

पाकिस्तानने ठेवलेल्या ११७ धावांचा पाठलाग करताना लंकेच्या संघातील फक्त दोघींनी कसा बसा दुहेरी आकडा गाठला. परिणामी श्रीलंकन महिला संघाचा डाव अवघ्या ८५ धावांत आटोपला.  भारतासोबत 'अ' गटात असलेल्या पाकिस्तान महिला संघाने ३१ धावांनी सामना जिंकत महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात अगदी दिमाखात केली आहे. 

श्रीलंकन महिलांनी गोलंदाजीत चमक दाखवली, पण...

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना युएईतील शारजाहच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानी महिला संघाची कर्णधार फतिमा सना (Fatima Sana) हिने  पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय़ लंकेच्या गोलंदाजीसमोर चुकीचा ठरतोय, असं चित्र पहिल्या इनिंगनंतर निर्माण झालं होते.  

अवघ्या ११६ धावांत आटोपला होता पाकिस्तान महिला संघाचा डाव

Srilanka Womens
Srilanka Womens

 विकेट किपर बॅटर मनीबा अली (Muneeba Ali) आणि गुल फेरोझा या जोडीनं पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. पाकिस्तान महिला संघाच्या धावफलकावर अवघ्या ६ धावा असताना सुगंधिकानं श्रीलंकन महिला संघाला पहिलं यश मिळवून दिलं. गुल ४ चेंडूत २ धावा करून गूल झाली. तिच्या पाठोापाठ मुनीबा अलीही सुगंधिका कुमारीच्या जाळ्यात फसली. तिने संघाच्या धावात ११ धावांची भर घातली. सीद्रा अमीन  सिद्रा अमीन १२(१०)  (Sidra Amin), उमैमा सोहेल १८(१९)( Omaima Sohail) आणि  निदा दर २३(२२) (Nida Dar) मोजक्या धावा करून परतल्यावर पाकिस्तानी कर्णधार फतिमान सना हिने २० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या संघातील अन्य बॅटर्संना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. परिणामी निर्धारित २० षटकात पाकिस्तानी महिला संघ ११६ धावांत आटोपला होता.   

श्रीलंकन बॅटर्संचा फ्लॉप शो; पाकिस्तानी कॅप्टनची अष्टपैलू खेळी

गोलंदाजीतील कामगिरीचा फायदा उठवत श्रीलंकन महिला बाजी मारतील, असे वाटत होते. पण  सलामीची बॅटर विश्मी गुणरत्ने २० (३४) (Vishmi Gunaratne) आणि  निशांका डि सिल्वा २२(२५) (Nilakshi de Silva) या दोघींशिवाय एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा महिला संघ १ विकेट असताना ८५ धांवापर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानकडून फतिमा सना, उमैमा सोहेल, नश्रा संधू यांनी प्रत्येकी  २ -२ तर सादिया इक्बाल हिने तिघींना तंबूचा रस्ता दाखवला. 

  
 

Web Title: ICC Womens T20 World Cup, 2024 2nd Match Fatima Sana Shine With Bat And Ball Pakistan Women won by 31 runs Against Sri Lanka Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.