ICC Womens T20 World Cup 2024 Bangladesh Women vs Scotland Women 1st Match Result : महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत यजमान बांगलादेश महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या स्कॉटलंड महिला संघाविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सेट केलेल्या १२० धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघाने शंभरीचा आकडा पार केला. पण १६ धावांनी ते मागेच राहिले.
बांगलादेशच्या संघानं सेट केलं होतं १२० धावांच टार्गेट
सलामीची बॅटर शाठी रानी २९ (३२) (Shathi Ran आणि,मुर्शिदा खातुन १२(१४) (Murshida Khatun), शोभना मोस्तारी३६ (३८) (Sobhana Mostary), कॅप्टन आणि विकेट किपर बॅटर निगार सुल्ताना १८ (१८) (Nigar Sultana)आणि फहिमा खातुन १० (५) (Fahima Khatun) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण एकाही बॅटरला आपली खेळी मोठी करता आली नाही. परिणामी बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकात ७ बाद ११९ धावांपर्यंत मजल मारू शकला. पण एवढ्या धावा त्यांच्यासाठी पुरेशा ठरल्या.
एकटी पडली तरी ती शेवटपर्यंत खेळली, पण...
सरासरी ६ या धावसंख्येसह धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्कॉटलंड महिला संघाकडून सॅरा ब्राइस (Sarah Bryce) एकटी पडली. तिने शेवटपर्यंत मैदानात थांबत संघाकडूनच नव्हे तर मॅचमध्ये सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. पण तिची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. तिने ५२ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने ४९ धावांची नाबाद खेळी केली. स्कॉटलंडच्या संघाला निर्धारित २० षटकात ७ बाद १०३ धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशच्या संघातील रितू मौनी हिने (Ritu Moni) ४ षटकात १५ धावा खर्च करून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तिला प्लेयर ऑफ मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Web Title: ICC Womens T20 World Cup 2024 Bangladesh Women vs Scotland Women 1st Match Bangladesh Women won by 16 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.