Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही संघातील सामना खेळवण्यात येणार आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:13 AM2024-10-04T11:13:15+5:302024-10-04T11:17:32+5:30

whatsapp join usJoin us
ICC Women's T20 World Cup 2024 India Women vs New Zealand Women Match Preview Probable XI Head-To-Head Record And Stats | Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's T20 World Cup 2024 India Women vs New Zealand Women Match : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीनं महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही संघातील सामना खेळवण्यात येणार आहे.   

नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील असेल. याआधी भारतीय महिला संघाने २०२० च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत फायनल गाठली होती. पण त्यावेळी या स्पर्धेत बोलबाला असलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाला शह दिला होता. नव्या उमेदीनं यंदाच्या स्पर्धसाठी सज्ज असलेला भारतीय संघ नवा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. 

स्मृतीसह या फिरकी गोलंदाजांवर असेल मोठी जबाबदारी 

Smriti Mandhana And Harmanpreet Kour
Smriti Mandhana And Harmanpreet Kour

भारतीय महिला संघात तरुण आणि अनुभवाची उत्तम सांगड दिसून येते. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघी संघाला दमदार सुरुवात करुन देतील, अशी अपेक्षा आहे. मध्यफळीत कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. विकेट किपर बॅटर रिचा घोष आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर डेथ ओव्हर्समध्ये तुफान फटकेबाजी करण्यात माहिर आहेत. त्या आपली जबाबदारी कशी पार पाडतात, ते पाहण्याजोगे असेल. दुबईच्या मैदानातील खेळपट्टी ही फिरकीसाठी अनुकूल आहे. या परिस्थितीत दीप्ती शर्मा, आशा शोभना आणि राधा यादव या तिघी प्रतिस्पर्धी संघाची गिरकी घेतील, अशी आशा आहे. 

न्यूझीलंडची मदार कुणावर?



सोफी डिव्हाइनच्या (Sophie Devine) नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ टी-२० क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसला आहे. ते कमबॅकसाठी प्रयत्नशील असतील. या संघाची धूरा सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या सुझी बेट्सवर असेल. तिच्याशिवाय अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिच्याकडूनही सर्वोत्तम खेळाची आस असेल. फिरकीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर अमेलिया  केर अधिक प्रभावी ठरू शकते. यावरषीच्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या महिला गोलदांजापैकी एक आहे.
 
भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामन्यातील आकडेवारी (India vs New Zealand – Women’s T20I head-to-head stats)

महिलांच्या T20I क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात आतापर्यंत १३ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील फक्त चार सामन्यात भारतीय महिला संघाला यश आले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने ९ सामने जिंकले आहेत. २०२२ मध्ये दोन्ही देशांतील ५ लढतीत न्यूझीलंडच्या महिलांनी ४-१ अशी बाजी मारली आहे.

भारताचा संभाव्य संघ (India predicted XI)

शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, राधा यादव, आशा शोभना/श्रेयंका पाटील, रेणुका सिंग.

बेंच- याश्तिका भाटिया, दयालन हेमलता , सजीवन सजना.


न्यूझीलंडचा संभाव्य संघ (New Zealand predicted XI)

सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाइन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इझाबेला गेझ, ली मेघन कॅस्पेरेक, जेस केर, इडन कार्सन, रोझमेरी मायर, ली ताहुहू.

बेंच- मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅना रोव 

 


 

Web Title: ICC Women's T20 World Cup 2024 India Women vs New Zealand Women Match Preview Probable XI Head-To-Head Record And Stats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.