ICC Womens T20 World Cup, 2024, INDW vs NZW 4th Match New Zealand Women have won the toss and have opted to bat : महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथ्या सामन्यातून भारतीय संघ महिला संघ या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारतीय महिला संघासमोर न्यूझीलंड महिला संघाचे चॅलेंज असणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार सोफी डिव्हाइन हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ आपल्या मोहिमेच्या सुरुवातीला न्यूझीलंड महिला संघानं सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना दिसेल.
आकडे न्यूझीलंडच्या बाजूनं, पण टीम इंडियालाही आहे नक्कीच संधी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत खेळवलेल्या १३ सामन्यात न्यूझीलंडचा संघ भारी ठरला आहे. ते ९-४ अशा फरकाने पुढे आहेत. पण गेल्या काही दिवसांत न्यूझीलंड महिला संघाची कामगिरी घसरली आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत भारतीय महिला संघ आपला रेकॉर्ड उत्तम करत टी-२० वर्ल्ड कपच्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारत 'अ' गटातील दुसरा सामना पाकिस्तान महिला संघा विरुद्ध खेळणार आहे. या संघाने आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे हायहोल्टेज सामन्यातील दबाव कमी करण्याच्या दृष्टिनेही टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचे असेल.
असा आहे भारतीय संघ
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेट किपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
न्यूझीलंडच्या संघानं या महिला खेळाडूंना दिली प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाइन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गॅझे (विकेट किपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन