पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री

एका बदलासह टीम इंडिया उतरली मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 03:22 PM2024-10-06T15:22:22+5:302024-10-06T15:30:24+5:30

whatsapp join usJoin us
ICC Womens T20 World Cup, 2024 IndW vs PakW 7th Match Pakistan Women opt to bat India Women Sajana replaced pooja | पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री

पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 ICC Womens T20 World Cup, 2024. India Women vs Pakistan Women, 7th Match  : महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हायहोल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिने टॉस जिंकून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला फिल्डिंगसाठी निमंत्रित केले आहे.

दबावात सर्वोत्तम खेळ करण्याचे चॅलेंज

भारत-पाक सामन्यात नेहमीच खेळाडूंवर अतिरिक्त दबाव असतो. या परिस्थिती धावांचा पाठलाग करण्यापेक्षा पाकिस्तानी महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग करत टार्गेट सेट करण्याला पसंती दिल्याचे दिसते. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील उणीवा भरून काढत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्यासाठी हरमनप्रीत कौर ब्रिगेड मैदानात उतरेल. यासाठी कॅप्टननं मोठी चाल खेळली आहे. पूजा वस्त्राकरच्या जागी  एस. सजना हिला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. हा गेम प्लान भारतीय महिलासाठी किती फायदेशीर ठरणार ते बघण्याजोगे असेलय 

अशी आहे भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन

स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेट किपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस. सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
 

Web Title: ICC Womens T20 World Cup, 2024 IndW vs PakW 7th Match Pakistan Women opt to bat India Women Sajana replaced pooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.