INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान

भारतीय महिला संघाला नेट रन रेटमध्ये सुधारणा करण्याची एक संधी होती. पण भारतीय संघाने फक्त पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानेच खेळ केल्याचे दिसून आले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 06:56 PM2024-10-06T18:56:00+5:302024-10-06T18:58:55+5:30

whatsapp join usJoin us
ICC Womens T20 World Cup 2024 INDW vs PAKW India Women won by 6 wkts Against Pakistan Women | INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान

INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Womens T20 World Cup 2024 ,  India Women vs Pakistan Women : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरुद्धचा आपला दबदबा कायम राखत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानी महिला संघाला भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १०५ धावांवर रोखले होते.

नेट रन रेट सुधारण्याची होती संधी, पण...

या धावांचा पाठलाग जलदगतीनं करून भारतीय महिला संघाला नेट रन रेटमध्ये सुधारणा करण्याची एक संधी होती. पण भारतीय संघाने फक्त पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानेच खेळ केल्याचे दिसून आले.  पाकिस्तानच्या संघाने ठेवलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. गोलंदाजीत पाकिस्तानी बॅटरचे  कंबरडे मोडणारी अरुंधती रेड्डी मॅच ऑफ द प्लेयर ठरली.

पाकिस्तानी महिला संघासमोर भारतीय महिला ब्रिगेडचा बोलबाला!

भारतीय महिला संघाने या सामन्यातील विजयासह पुन्हा एकदा पाकिस्तान महिलांसमोर आपणच भारी असल्याचा शो दाखवला.  याआधी भारत आणि पाकिस्तान महिला संघ टी-२० क्रिकेटमध्ये १५ वेळा समोरासमोर आले होते. यात भारतीय संघाने १२ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पाकिस्तानच्या संघाने यश मिळवले होते. वर्ल्ड कप स्पर्धेत याआधी हे दोन संघ ६ वेळा समोरा समोर आले होते. यात भारतीय महिला संघ ४-२ अशा फरकाने आघाडीव होता. हा रेकॉर्ड आता आणखी मजबूत झाला आहे. 

टीम इंडियाच्या ताफ्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदल; फसलेला प्रयोग टाकला बाजूला

 शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या १८ धावा असताना स्मृती मानधनाच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला. ही विकेट पडल्यावर भारतीय संघाने गेम प्लानमध्ये मोठा चेंज केल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार हरमप्रीत कौरच्या ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर जेमिमा रॉड्रिंग्ज खेळायला आली. तिने शफाली वर्माच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी  ४३ धावांची भागीदारी केली.

पाकिस्तानी कॅप्टननं लागोपाठ दोन विकेट्स घेतल्या, पण भारतीय महिला त्यामुळे अडखळल्या नाहीत 

शफालीच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का बसला. तिने ३५ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाच्या धावफलकावर ८० धावा असताना संघाने जेमिमा रॉड्रिग्ज २३(२८) आणि रिचा घोष ०(१)  या दोघींच्या विकेट्स एका पाठोपाठ गमावल्या. पाकिस्तानी कॅप्टन  फातिमा सना हिने या विकेट्स घेतल्या.  १८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत कौरला मानेला दुखापत झाली. विजयासाठी फक्त दोन धावांचीनी गरज असल्यामुळे या परिस्थितीत कोणतीही जोखीम न घेता तिने मैदान सोडणंच पसंत केले. रिटायर्ड हर्ट होण्याआधी भारतीय कॅप्टननं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात २४ चेंडूत २९ धावांची खेळी केली.  कॅप्टनच्या जागी मैदानात उतरलेल्या आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या सजीवन सजनानं खणखणीत चौकार मारत संघाचा विजय सुनिश्चित केला.

गोलंदाजी बहरली, आता स्मृती मानधनाचा फॉर्म चिंतेचा विषय

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाच्या खात्यात २ गुण जमा झाले आहेत. आता टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. पहिल्या पराभवानंतर भारतीय संघाच्या गोलंदाजी बहरली आहे.  पण बॅटिंगमध्ये स्मृती मानधनाचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय असेल.  श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ नेट रन रेट सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल. यात स्मृती लयीत येणं खूप गरजेचे असेल. 

 

Web Title: ICC Womens T20 World Cup 2024 INDW vs PAKW India Women won by 6 wkts Against Pakistan Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.