Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल

न्यूझीलंड महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात रंगणार फायनल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:00 PM2024-10-18T23:00:38+5:302024-10-18T23:04:03+5:30

whatsapp join usJoin us
ICC Womens T20 World Cup 2024 New Zealand Women beat West Indies WomenIn 2nd Semi Final And Play Final Against South Africa Women | Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल

Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

West Indies Women vs New Zealand Women, 2nd Semi Final : शारजहाच्या मैदानात रंगलेल्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड महिला संघाने २०१६ च्या  टी-२० वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज महिला संघाला पराभूत केले आहे.  या सामन्यात ८ धावांनी विजय नोंदवत न्यूझीलंड संघानं फायनल गाठली. आता रविवारी २० ऑक्टोबरला हा संघ दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध फायनल खेळताना दिसेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या महिला टी-२० हंगामात नवा चॅम्पियन संघ पाहायला मिळणार हे फिक्स झाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सेमीफायनलमध्ये ६ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.  

हा संघ फायनल खेळेल, याचा कुणी विचारही नव्हता केला, कारण....

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंडचा संघाची अवस्था खूपच बिगट होती. ११ पैकी १० टी-२० सामन्यातील पराभवाचा सामना करून हा संघ महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यामुळे टॉप ४ मध्येही हा संघ पोहचेल, असे कुणाला वाटले नव्हते. पण भारतीय महिला संघाविरुद्ध दमदार विजयासह त्यांनी पराभवाची मालिका खंडीत करत यंदाच्या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात अगदी धमाक्यात केली. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण अन्य कोणत्याही संघाचा त्यांच्यासमोर निभाव लागला नाही.

गोलंदाजीत वेस्ट इंडिजच्या  डिआंड्रा डॉटिनचा चौका, तरी न्यूझीलंडनं गाठला १२८ चा आकडा 

दुसऱ्या सेमी फायनलच्या लढतीत न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाइन (Sophie Devine) हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुझी बेट्स (Suzie Bates)  आणि  जॉर्जिया प्लिमर (Georgia Plimmer) या न्यूझीलंडच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. सुझी बेट्स हिने २८ चेंडूत २६ धावांचे योगदान दिले. याशिवाय जॉर्जियाने ३१ चेंडूत ३३ धावा केल्या. ही न्यूझीलंच्या संघाकडून कोणत्याही बॅटरनं केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.  सोफी डिव्हाइन १२ (१२),  ब्रुक हालीडे  १८(९) आणि इसाबेला २०(१४) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. न्यूझीलंडच्या संघान निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १२८ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाकडून डिआंड्रा डॉटिन (Deandra Dottin)  हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय फ्लेचरनं आपल्या खात्यात २ विकेट्स जमा केल्या.  तर क्रिश्मा आणि अलीयाह यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

बॉलिंगमध्ये चमकली तिच बॅटिंग वेळीही लढली, पण.. 

न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज महिला संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १६ धावांवर पहिली विकेट गमावली. ठराविक अंतराने विकेट्सचा सिलसिला कायम राहिला. गोलंदाजीत कमाल दाखवणारी डिआंड्रा डॉटिन इथंही  कॅरेबियन संघाच्या मदतीला धावून आली. तिने २२ चेंडूत ३३ धावांची खेळी करत वेस्ट इंडिजच्या  आशा पल्लवित केल्या. पण अमेरिया खेर हिने तिची विकेट घेत फायनलच्या वाटेतील मोठा अडथळा दूर केला.  डिआंड्रा डॉटिन माघारी फिरल्यावर तळाच्या फलंदाजांनी फायनलसाठी धडपड केली. पण न्यूझीलंड महिला संघाने सामन्यावरील पकड मजबूत करत अखेर विजयाचा डाव साधला. वेस्ट इंडिजच्या संघाला निर्धारित २० षटकात ८ बाद १२० धावांपर्यंतच मजल मारता आली. 

Web Title: ICC Womens T20 World Cup 2024 New Zealand Women beat West Indies WomenIn 2nd Semi Final And Play Final Against South Africa Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.