ICC Women's T20 World Cup Updated Points Table - आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियासोबत इंग्लंडच्या संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. शनिवारी 5 ऑक्टोबरला दुपारच्या सत्रातील सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने श्रीलंकेच्या संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रातील सामन्यात इंग्लंडच्या संघाने बांगलादेश महिला संघाला २१ धावांनी मात दिली.
आता एक पराभवही टीम इंडियासाठी महागात पडू शकतो
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 'अ' गटातील गुणतालिकेत दुसऱ्या क्रमंकावर पोहचला आहे. या गटात भारतीय महिला संघ तळाला असल्याचे दिसून येते. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत झाल्यामुळे नेट रन रेटचाही मोठा फटका हरमनप्रीत ब्रिगेडला बसल्याचे दिसते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय महिला संघाला आता पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकावेच लागेल. यातली एखाद्या सामन्यातील पराभवही टीम इंडियाची गणिते बिघडू शकतो. कारण रन रेटमध्ये भारतीय महिला संघ खूप पिछाडीवर आहे.
'अ' गटात न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व
'अ' गटात ऑस्ट्रेलियाशिवाय न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाने विजयाने सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाविरुद्ध मोठ्या विजयासह सर्वोत्तम नेट रनरेटसह न्यूझीलंडचा संघ अव्वलस्थानी आहे. त्यांचे नेट रन रेट २.९०० असे आहे. ऑस्ट्रेलिया १.९० नेट रनरेटसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा संघ १.५५० नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. या गटात भारतासह श्रीलंकेच्या संघाला खातेही उघडता आलेले नाही.
संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | टाय | गुण | नेट रन रेट |
न्यूझीलंड | १ | १ | ० | ० | ० | २ | +२.९०० |
ऑस्ट्रेलिया | १ | १ | ० | ० | ० | २ | +१.९०८ |
पाकिस्तान | १ | १ | ० | ० | ० | २ | +१.५५० |
श्रीलंका | २ | ० | २ | ० | ० | ० | -१.६६७ |
भारत | १ | ० | १ | ० | ० | ० | -२.९०० |
'ब' गटात इंग्लंड मारली बाजी
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर इंग्लंडचा संघ 'ब' गटात अव्वल स्थानी पोहचला आहे. या गटात बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. पण सर्वोत्तम रन रेटसह इंग्लंड टॉपर आहे. वेस्टइंडीज आणि स्कॉटलंड यांना अजून एकही विजय मिळालेला नाही.
ब गटात कोणता संघ कोणत्या स्थानावर?
संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | टाय | गुण | नेट रन रेट |
इंग्लंड | १ | १ | ० | ० | ० | २ | +१.०५० |
दक्षिण आफ्रिका | १ | १ | ० | ० | ० | २ | +०.७७३ |
बांगलादेश | २ | १ | १ | ० | ० | २ | -०.१२५ |
वेस्ट इंडीज | १ | ० | १ | ० | ० | ० | -०.७७३ |
स्कॉटलंड | १ | ० | १ | ० | ० | ० | -०.८०० |