ICC Women's T20 World Cup, Final: अ‍ॅलिसा हिलीने रचला मोठा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये पार केला दोन हजार धावांचा टप्पा

ICC Women's T20 World Cup, Final: २०१० मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अ‍ॅलिसा हिली हिने आतापर्यंत १०० हून अधिक टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 01:27 PM2020-03-08T13:27:11+5:302020-03-08T13:51:34+5:30

whatsapp join usJoin us
ICC Women's T20 World Cup, Final: Alyssa Healy sets a big record, crosses 2,000 runs in T-20 cricket BKP | ICC Women's T20 World Cup, Final: अ‍ॅलिसा हिलीने रचला मोठा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये पार केला दोन हजार धावांचा टप्पा

ICC Women's T20 World Cup, Final: अ‍ॅलिसा हिलीने रचला मोठा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये पार केला दोन हजार धावांचा टप्पा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांवर हुकूमत गाजवत शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या अ‍ॅलिसा हिली हिने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारी ती ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 

२०१० मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अ‍ॅलिसा हिली हिने आतापर्यंत १०० हून अधिक टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, महिला टी-२०  विश्वचषकाच्या अंतिम लढतीत धडाकेबाज ७५ धावांची खेळी करत हिलीने ही लढत अविस्मरणीय बनवली.


या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर अ‍ॅलिसा हिली आणि मूनी यांनी केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?

Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान

अ‍ॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

Web Title: ICC Women's T20 World Cup, Final: Alyssa Healy sets a big record, crosses 2,000 runs in T-20 cricket BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.