ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारतीय गोलंदांची धुलाई केली. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राधा यादवने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तिनं हिलीला वेदा कृष्णमुर्तीकरवी झेलबाद केले. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या. पण, हिलीनं या सामन्यात असा पराक्रम केला, की जो आतापर्यंत महिला सोडा पुरुष क्रिकेटपटूलाही करता आलेला नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे आहे. भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची ही अंतिम फेरीत खेळण्याची सहावी वेळ आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यासाठी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माकडे चेंडू सोपवला. अॅलिसा हिलीनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून तिचे स्वागत केले. पण, पाचव्याच चेंडूवर शेफाली वर्मानं हिलीचा सोपा झेल सोडला. ऑसींनी पहिल्याच षटकात १४ धावा खेचल्या. अॅलिसा हिलीनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारी ती दुसरी ऑस्ट्रेलियन, तर एकूण ११ वी फलंदाज ठरली आहे. हिलीने बेथ मूनीसह फटकेबाजी सुरूच ठेवली. हिलीनं दीप्तीच्या दुसऱ्या षटकात ९ धावा कुटल्या. चौथ्या षटकात राजेश्वरी गायकवाडने तिच्याच गोलंदाजीवर बेथ मूनाच सोपा झेल सोडला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४९ धावा केल्या.
महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१६च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर आणि हिली मॅथ्यू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० धावा चोपल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार
अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?
Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान