Join us  

ICC Women's T20 World Cup, Final: ऑसी महिला संघाच्या धुलाईने जाग्या केल्या 'त्या' पराभवाच्या कटू आठवणी

संपूर्ण अंतिम अजेय असलेल्या भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत वरचढ कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 3:04 PM

Open in App

 मेलबर्न - महिला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत आहे. दरम्यान, संपूर्ण स्पर्धेत अजेय असलेल्या भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत वरचढ कामगिरी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने केलेल्या धुलाईमुळे २००३ साली पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेत झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील लढतीच्या कटू आठवणी ताजा झाल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या त्या लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताची धुलाई केली होती. काहीसे असेच चित्र आज एमसीजीवर दिसून आले. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या फटकेबाजीसमोर भारताचे गोलंदाज हतबल झाल्याचे दिसले.  

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीनं अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात हातभार लावला. मूनीनं अखेरपर्यंत खिंड लढवताना टीम इंडियासमोर डोंगराएवढे आव्हान उभे केले होते. 

दरम्यान, या लढतीत ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारताला विजयाची आशा होती. मात्र या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारी शेफाली वर्मा पहिल्याच षटकात बाद झाली. त्याबरोबरच भारताच्या विश्वविजेते बनण्याचा स्वप्नाला सुरुंग लागला. अगदी २००३ च्या विश्वचषकातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अशाच प्रकारे बाद झाल्यानंतर भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?

Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान

अ‍ॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

अ‍ॅलिसा हिलीने रचला मोठा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये पार केला दोन हजार धावांचा टप्पा

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया