ICC Women's T20 World Cup, Final: पहिल्यांदा जेतेपदाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय संघाला आज, मेलबोर्न क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियानं यजमान ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. यंदाच्या स्पर्धेतील जेतेपद पटकावणाऱ्या संघावर पैशांचा धो धो पाऊस पडणार आहे. २०१८च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तुलनेत यंदाची बक्षीस रक्कम ही ३२०% अधिक असणार आहे.
भारताने अ गटात अपराजित राहून अंतिम फेरी गाठली. चार विजयांपैकी सलामीच्या सामन्यात यजमानांना भारताने १७ धावांनी पराभूत केले होते. इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना पावसात वाहून गेल्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारताच्या यशात १६ वर्षांच्या शेफाली वर्माची आक्रमक फटकेबाजी आणि फिरकी गोलंदाजांची कामगिरी अधोरेखित करणारी ठरली. तरीही प्रथमच जेतेपद पटकवायचे झाल्यास स्मृती मानधना, हरमन कौर यांच्यासह मधल्या फळीतील फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील.
दुसरीकडे भारतीय संघ मोठ्या सामन्यात दडपणात येतो. २०१७ च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात तसेच २०१९ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा फटका सहन करावा लागला होता. यावेळी शेफाली आणि स्मृती यांच्याकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. त्यानंतर मधल्या फळीला धावडोंगर उभारावा लागेल. गोलंदाजीत लेगस्पिनर पूनम यादव आणि शिखा पांडे यांच्यासह राधा यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांच्यावर भिस्त असेल.
विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) यंदा महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे यंदाचा विजेता संघ चषकासह मोठी रक्कम घेऊन घरी जाईल. २०१८च्या वर्ल्ड कपच्य तुलनेत यंदाच्या विजेत्या संघाला ३२०% वाढीव बक्षीस रक्कम मिळणार आहे. यंदा विजेत्या संघाला ७.१६ कोटी, तर उपविजेत्यांना ३.५८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
अशी असेल बक्षीस रक्कम
विजेता - ७.१६ कोटी
उपविजेता - ३.५८ कोटी
उपांत्य फेरीतील संघ ( पराभूत संघ) - १२ लाख २१०,४१ रुपये
उपांत्यपूर्व फेरी संघ ( पराभूत संघ) - ५ लाख, ९२०, २० रुपये
साखळी फेरीतील विजेता - २ लाख, २२०, ०७ रुपये
साखळी फेरीतील पराभूत - १ लाख, ४८०, ०५ रुपये
Web Title: ICC Women's T20 World Cup, Final: Know ICC Women’s T20 World Cup 2020 Prize Money svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.