ICC Women's T20 World Cup Europe Region : आयसीसीच्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या युरोप विभागाच्या पात्रता स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली. आयर्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यातल्या या सामन्यात आयर्लंडच्या महिला संघानं १६४ धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यात आयर्लंडच्या गॅबी लेवीसनं शतक झळकावून इतिहास घडवला. आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली. आतापर्यंत २९ महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावता आलेले आहे. ( Gaby Lewis became the 1st Irish Women to score a T20I hundred and 29th overall in WT20Is. #WT20Qualifiers)
आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९६ धावा केल्या. रेबेका स्टोकेलनं ३० चेंडूंत ४४ धावा केल्या आणि त्यात ५ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. गॅबीनं ११ चौकार व ३ षटकार खेचताना ६० चेंडूंत नाबाद १०५ धावा केल्या. कर्णधार लॉरा डेलनीनं २२ धावांचे योगदान दिले. जर्मनीकडून बिआंका लोच व शरण्या सदारंगणी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ( Qualification for the Women’s T20 World Cup 2023 starts today in Europe). प्रत्युत्तरात जर्मनीला २० षटकांत ३ बाद ३२ धावाच करता आल्या. ख्रिस्टीना गॉफनं ५८ चेंडूंत १४ धावा केल्या. अॅना हीलीनं २० चेंडूंत ३ धावा केल्या. ( Ireland Women scored 196 in 20 overs against Germany Women.)