Join us

INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..

IND vs PAK Renuka Singh Stuns PAK Early, Clean-Bowls Gull Feroza; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 16:11 IST

Open in App

IND vs PAK Renuka Singh Stuns PAK Early, Clean-Bowls Gull Feroza; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात सुरु आहे. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय भारतीय ताफ्यातील पेसर रेणुका सिंह (Renuka Singh) हिने अगदी फोल ठरवला. 

चेंडू कळण्याआधी पाकिस्तानी बॅटर झाली बोल्ड!

भारतीय महिला संघाच्या ताफ्यातील गोलंदाजीतील हुकमी एक्का असलेल्या रेणुका सिंह हिने पाकिस्तानची सलामीवीर गुल फिरोजा (Gull Feroza) हिला खातेही उघडू दिले नाही. रेणुकाने पहिल्याच षटकात पाकिस्तानला दणका देत भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले.  रेणुकाचा चेंडू पडल्यावर कधी आत वळला ते बॅटरला कळलही नाही. ही विकेट पुन्हा पुन्हा पाहावी अशीच होती. 

भारतीय संघाला पहिल्या ओव्हरमध्ये पहिलं यश

रेणुका सिंह २०२१ पासून भारतीय महिला संघातून खेळताना दिसते. ज्या ज्या वेळी ती चालते त्यावेळी भारतीय संघ सामना जिंकतो, हा एक रेकॉर्डच आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये तिने विकेट मिळवून देत या सामन्यातील विजयाचा पहिला संकेतच आहे. पाकिस्तानची सलामीवीर गूल फिरोझा चार चेंडू खेळली पण तिला खातेही काही उघडता आले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही ती फक्त २ धावा करू शकली होती. 

न्यूझीलंड विरुद्धच्या  सामन्यात रेणुकानं केली होती सर्वोच्च कामगिरी, पण..

रेणुका सिंह हिने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही भारताकडून सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती. ४ षटकात तिने फक्त २७ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या होत्या. पण इतर गोलंदाजांची तिला साथ लाभली नाही. परिणामी भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गूल फिरोजाच्या विकेट्सह रेणुकनं स्पर्धेत तिसरी विकेट आपल्या खात्यात जमा केली आहे.   

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानहरनमप्रीत कौर