Join us  

Women's T20 World Cup: कॅप्टनवर कोसळला दु:खाचा डोंगर; स्पर्धा सोडून तिनं थेट घर गाठलं

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  नवव्या हंगामातील लढती  युएईच्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. साखळी फेरीतील दोन सामने बाकी असताना पाकिस्तान महिला ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 6:05 PM

Open in App

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  नवव्या हंगामातील लढती  युएईच्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. साखळी फेरीतील दोन सामने बाकी असताना पाकिस्तान महिला संघ आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कॅप्टन फातिमा सना ही मायदेशी परतली आहे.  वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळताच तिने घरचा रस्ता धरला. तिच्या अनुपस्थितीत उर्वरित सामन्या मुनीबा पाक संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळू शकते.

अचानक आलेल्या या बातमीमुळे संघासह चाहत्यांना मोठा धक्का

 पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सना हिच्या वडिलांचे गुरुवारी कराची येथे अचानक निधन झाले. ही बातमी कळल्यावर फातिमा संघाच्या ताफ्यातून बाहेर पडत घरी परतली आहे. पाक संघाची माजी कर्णधार  निदा दर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. या दु:खाच्या परिस्थितीत संघातील सर्वजणी फातिमाच्या दु:खात सामील आहेत, असे तिने म्हटले आहे. 

महिला टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात युवा कॅप्टन

फातिमा सना यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धात पाकिस्तान संघाचे नेतृत्व करण्याठी मैदानात उतरली होती.  सहभागी १० संघातील ती सर्वात युवा कॅप्टनही ठरली होती. तिच्या नेतृत्वाखाली  पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून विजयासह वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध मात्र पाकला पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही सामन्यात फातिमा सनानं सर्वोत्तम कामगिरी केली होती. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्ध जिंकावे लागणर आहे. सनाच्या अनुपस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करणं हे संघासाठी मोठ चॅलेंजच असेल.

भारताच्या गटात तिसऱ्या स्थानावर आहे पाकिस्तान

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारतासह 'अ' गटात आहे. ऑस्ट्रेलिया संघ २ पैकी २ सामन्यातील विजयासह ४ गुणांसह एकदम टॉपला असून भारतीय संघ ३ सामन्यातील २ विजयासह ४ गुणांसह दुसऱ्या आणि पाकिस्तान १ विजय आणि १ पराभवासह  २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ १  विजय आणि १ पराभवासह २ गुणासह चौथ्या स्थानावर असून श्रीलंकेचा संघ या स्पर्धेतून आउट होणारा पहिला संघ आहे. जो पाचव्या स्थानी आहे. 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकऑफ द फिल्डपाकिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024