Join us  

Womens T20 World Cup : न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीचा टीम इंडियावर कसा होईल परिणाम?

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या विजयासह इंग्लंडचा संघ 'ब' गटात अव्वलस्थानावर पोहचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 12:29 PM

Open in App

ICC Womens T20 World Cup Updated Points Table : आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नवव्या सामन्यात 'ब' गटातील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या विजयासह इंग्लंडचा संघ 'ब' गटात अव्वलस्थानावर पोहचला आहे.

'ब' गटात इंग्लंडची सेमीची दावेदारी एकदम भक्कम

'ब' गटात इंग्लंडच्या संघाने अव्वल स्थानी पोहचत सेमी फायनलची आपली दावेदारी भक्कम केली आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका संघाच्या खात्यात वेस्ट इंडीज इतकेच २ गुण जमा आहेत. पण नेट रन रेटच्या जोरावर वेस्ट इंडीजचा संघ दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या गटात बांगलादेशचा संघ २ पैकी १ विजय आणि १ पराभवासह चौथ्या तर स्कॉटलंडचा संघ दोन सामन्यातील पराभवासह तळाला आहे.  

'अ' गटात टीम इंडिया अडचणीत; न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर काय असेल समीकरण

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'अ' गटात न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. दोन्ही संघांनी स्पर्धेत एक-एक सामना खेळला आहे. मंगळवारी हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध भिडणार आहेत. जर न्यूझीलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर भारतीय संघाचे सेमी फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्याचा मार्ग अधिक सोपा होईल. कारण या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघाला सेमी फायनल खेळण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य होईल. दुसरीकडे भारतीय संघही त्याच परिस्थितीत आहे. साखळी फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासह ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघाला ६ गुणांसह सेमीची दावेदारी भक्कम करता येईल. पण  न्यूझीलंडच्या संघाने  ऑस्ट्रेलियाप्रमाणेच पाकिस्तानच्या संघाला देखील पराभूत करणं गरजेचे आहे.  

ऑस्ट्रेलिया जिंकली तर काय?

'अ' गटात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली तर सेमीच्या शर्यतीतील दावेदारी भक्कम करण्यासाठी न्यूझीलंडसमोर उर्वरित दोन सामने जिंकण्याचे चॅलेंज निर्माण होईल. पण भारतासाठी परिस्थिती आणखी बिकट होईल.  न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील विजयासह ६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. दुसरीकडे भारतीय संघ उर्वरित दोन सामन्यात जिंकला तरी नेट रन रेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात भारी ठरण्याचे एक वेगळेच चॅलेंज हरमनप्रीत ब्रिगेडवर असेल.

पाकिस्तानही सेमीच्या शर्यतीत

 भारताच्या गटात फक्त श्रीलंकेचा प्रवास संपल्यात जमा आहे.  पाकिस्तानच्या संघाला अजूनही संधी आहे.  उर्वरित २ सामने जिंकून त्यांनाही ६ गुणांपर्यंत पोहचण्याची संधी आहे. पण यासाठी त्यांना सध्याच्या घडीला टॉप २ मध्ये असलेल्या दोन्ही संघांना पराभूत करून दाखवावे लागेल.  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात जो जिंकेल त्याची 'अ' गटातून  सेमीसाठीची दावेदारी अधिक भक्कम होईल. दुसऱ्या स्थानासाठी या गटात रन रेटचा मुद्दाही पाहायला मिळू शकतो.

'अ' गटात कोणता संघ कोणत्या स्थानावर?
संघसामनेविजयपराभव  टायअनिर्णित  गुणनेट रन रेट
न्यूझीलंड ०+२.९००
ऑस्ट्रेलिया    +१.९०८
पाकिस्तान+०.५५५
भारत     -१.२१७
श्रीलंका    -१.६६७ 
'ब' गटात इंग्लंडचा संघ सर्वात भारी
संघसामनेविजयपराभव  टाय  अनिर्णित  गुणनेट रन रेट
इंग्लंड+०.६५३
वेस्ट इंडीज+१.१५४
दक्षिण आफ्रिका+०.२४५
बांगलादेश    -०.१२५
स्कॉटलंड    -०.८००