ICC Women’s T20I Team of the Year 2021 : आयसीसीनं बुधवारी २०२१ वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. इंग्लंडच्या नॅट शिव्हरनं ( Nat Sciver) या संघाचे कर्णधारपद पटकावले आहे. या अव्वल ११ खेळाडूंमध्ये स्थान पटकावणारी स्मृती मानधना ( Smriti Mandhana) ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. या संघात इंग्लंडच्या सर्वाधिक पाच खेळाडूंना स्थान मिळाले आहे. नॅट शिव्हरसह टॅमी ब्यूमॉन्ट, डॅनी व्हॅट, एमी जोन्स आणि सोफी एकलेस्टोन या इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माइल, लॉरा वूलवॉर्ट व मारियन कॅप यांचा समावेश आहे. याशिवाय आयर्लंडची गॅबी लुईस व झिम्बाब्वेची लॉरिन फिरी याही या संघात आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूचा या संघात समावेश नाही. स्मृती मानधनानं २०२१मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिनं ३१.८७च्या सरासरीनं २५५ धावा केल्या आहेत. त्यामुळेच तिची सलामीवीर म्हणून निवड केली गेली आहे. तिची सहकारी ब्यूमॉन्टनं ९ सामन्यांत ३०३ धावा केल्या आहेत.
डॅन व्हॅटनं ९ सामन्यांत ३१.५०च्या सरासरीनं २५२ धावा केल्या आहेत. गॅबी लुईसनं ३२५ धावा केल्या आहेत आणि आयर्लंडकडून ट्वेंटी-२०त शतक झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. नॅट शिव्हरनं १५३ धावा आणि १० विकेट्स घेतल्या आहेत. एमी जोन्सनं १५१ धावा केल्या आहेत. कॅपनं ६ सामन्यांत १०० धावा व ८ विकेट्स घेतल्या आहेत. सोफीनं ११ विकेट्स घेतल्या आहेत.
महिला संघ - स्मृती मानधना, टॅमी ब्यूमॉन्ट, डॅनी व्हॅट, गॅबी लुईस, नॅट शिव्हर ( कर्णधार), अॅमी जोन्स, लौरा वोलव्हार्ट, मॅरी कॅप, सोफी एक्लेस्टोन, लॉरीन फिरी, शबनिम इस्मैल ( ICC Women’s T20I Team of the Year: Smriti Mandhana, Tammy Beaumont, Danni Wyatt, Gaby Lewis, Nat Sciver (captain), Amy Jones (wicketkeeper), Laura Wolvaardt, Marizanne Kapp, Sophie Ecclestone, Loryn Phiri and Shabnim Ismail.)
Web Title: ICC Women’s T20I Team of the Year 2021 : Smriti Mandhana Only Indian Named in ICC Women's T20I Team of the Year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.