Join us

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा भारत दौरा! मुंबईत कधी येणार? ३ ऑक्टोबरपासून थरार

Team India Women Squad for T20 World Cup 2024 Announced : ३ ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 15:44 IST

Open in App

women's t20 world cup trophy tour : यूएईत महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आगामी काही दिवसांत विश्वचषकाची ट्रॉफी बंगळुरू आणि मुंबईच्या दौऱ्यावर असेल. या शानदार ट्रॉफीने ३ सप्टेंबर रोजी दुबईचा दौरा केला. ट्रॉफीचा भारत दौरा ६ सप्टेंबर रोजी कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट येथून सुरू होईल. त्यानंतर ७ आणि ८ सप्टेंबर रोजी चाहत्यांना बंगळुरुतील नेक्सस मॉल कोरमंगला येथे ट्रॉफी जवळून पाहता येईल. 

दरम्यान, विश्वचषकाची ट्रॉफी १० सप्टेंबर रोजी मुंबईत पोहोचेल, जिथे चाहत्यांना १४ आणि १५ सप्टेंबर रोजी मालाड येथील इन्फिनिटी मॉलमध्ये ट्रॉफी पाहण्याची संधी मिळेल. भारत दौरा संपल्यानंतर ट्रॉफी ३ ऑक्टोबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यासाठी यूएईला परतण्यापूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशला भेट देईल. 

अलीकडेच बीसीसीआयने आगामी विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली. BCCI ने जाहीर केलेल्या १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. नुकतेच ICC ने T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले. ही स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. महिला विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसीने ठिकाण बदलले. २० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल.

भारताचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय महिला क्रिकेट संघआयसीसी