गयाना : भारतीय महिला क्रिकेटसंघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी चौकार खेचला. अखेरच्या साखळी सामन्यांत त्यांनी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करताना 'B' गटात अव्वल स्थान पक्के केले. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला.
१६८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करनाचा त्यांचे दोन्ही सलामीच्या फलंदाज पाचव्या षटकात माघारी फिरल्या. दिप्ती शर्माने सलग दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यांची सलामीची नियमित फलंदाज ॲलिसा हिली जायबंद झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला सावरणे कठीण झाले आणि त्यांना 19.4 षटकांत 9 बाद 119 धावा करता आल्या.
तत्पूर्वी, स्मृती मानधनाने (८३) तुफानी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही (४३) आक्रमक खेळी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. या दोघींच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ८ बाद १६७ धावा चोपल्या.