साऊथम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शकीब अल हसनची अष्टपैलू कामगिरी बांगलादेशने आज अफगाणिस्तानवर मिळवलेल्या विजयात निर्णायक ठरली. सुरुवातीला 51 धावांची अर्धशतकी खेळी करणाऱ्या शकीबने नंतर गोलंदाजीमध्ये कमाल करताना पाच बळी टिपले. विश्वचषकातील एकाच सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा शकीब हा युवराज सिंहनंतरचा दुसरा खेळाडू ठरला. या विक्रमाबरोबरच शकीबने अजून एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. विश्वचषक स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि दहा बळी अशी कामगिरी करणार शकीब हा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
शकीबने आपल्या नावे केलेले विक्रम - विश्वचषक स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि 10 बळी घेणार पहिला फलंदाज - एका सामन्यात 50 धावा आणि पाच बळी घेणार दुसरा खेळाडू - 29 धावांत पाच बळी, विश्वचषकात बांगलादेशसाठी एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी - विश्वचषकात बांगलादेशकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंजाज- विश्वचषकात बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा - 2019 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज