लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अखेरच्या लढतीतही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात अफगाणिस्तानला 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजच्या 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 288 धावाच करता आल्या. पण, या सामन्यात अफगाणिस्ताचा यष्टिरक्षक-फलंदाज इक्राम अली खिलनं 86 धावांची खेळी केली. त्याने 93 चेंडूंत 86 धावा करताना वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रम नावावर केला. वर्ल्ड कप स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा तिसरा युवा फलंदाजइक्राम हा 18 वर्ष 278 दिवसांचा आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम बांगलादेशच्या तमीम इक्बालच्या नावावर आहे. त्याने 2007 मध्ये 17 वर्ष 362 दिवसांचा असताना भारताविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता. त्याआधी मोहम्मद अश्रफुलने ( 18 वर्ष 234 दिवस) न्यूझीलंडविरुद्ध 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अर्धशतक झळकावले होते. इक्रामने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रमइक्रामने वर्ल्ड कप इतिहासात 80+ धावा करणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम नावावर केला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 1992च्या स्पर्धेत 18 वर्ष 318 दिवसांचा असताना 81 धावांची खेळी केली होती.शिवाय वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक करणारा सर्वात युवा यष्टिरक्षकाचा मानही इक्रामने पटकावला. यापूर्वी हा विक्रम बांगलादेशच्या मुशफिकुर रहीम ( 19 वर्ष 246 दिवस) याच्या नावावर होता. त्याने 2007मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ही कामगिरी केली होती.
अखेरच्या सामन्यानंतर गेलने उघडले गुपित, पाहा व्हिडीओ...आपल्या अखेरच्या सामन्यात ख्रिस गेल भावुक झाला होता. विश्वचषकातील अखेरचा सामना जिंकल्यावर गेल आनंदात होता. त्यामुळे या सामन्यानंतर त्याने एक गुपित उलगडले आहे. एका व्हिडीओमध्ये गेलने हे गुपित सांगितलं आहे. हे गुपित नेमकं आहे तरी काय...
पाहा व्हिडीओ...चाहत्यांबरोबर सेल्फी काढायचा मोह गेलला आवरता आला नाहीआपल्या अखेरच्या सामन्यात ख्रिस गेल भावुक झालेला पाहायला मिळाला. विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात गेलला विजयाची चव चाखता आली. त्याचबरोबर संघाने त्याला एक भेटही दिली. पण यावेळी गेलला चाहत्यांनाबरोबर सेल्फी काढायचा मोह आवरता आला नाही. सामना संपल्यावर आपल्या चाहत्यांना खूष करण्यासाठी गेलले त्यांच्याबरोबर खास सेल्फी काढला.