लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानने शनिवारी भारतासारख्या दिग्गज संघांला कडवी झुंज दिली होती. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानचे मनोबल कमालीचे उंचावलेले दिसत आहे. कारण त्यांनी एका प्रतिस्पर्धी संघाला चांगलीच वॉर्निंग दिली आहे. ही वॉर्निंग देताना अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नईबने, हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... या ओळींचाही वापर केला आहे.
अफगाणिस्तानचा यापुढील सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परीषद झाली होती. या परिषदेला अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नईब आला होता. या पत्रकार परिषदेमध्ये त्याने बांगलादेश वॉर्निंग दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या परिषदेमध्ये गुलबदिनने बांगलादेशबाबत बोलताना हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... या ओळींचा वापर केला.
भारताने सामना आणि अफगाणिस्तानने मनं जिंकलीभारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही.रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवून अफगाणिस्तानने टीम इंडियाला कोंडीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून संघाला या गुंत्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकाचे शतकात रुपांतर करता आले नाही. विजय शंकरला आज मोठी खेळी करून आपले स्थान पक्कं करण्याची संधी होती, परंतु तोही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. त्यामुळे भारताला २२४ धावांपर्यंतच मजल मारता आली.रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमालवर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजीब उर रहमानच्या कॅरम बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. डावाच्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहमानने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांना बाद करता आलेले नाही, परंतु अफगाणिस्तानच्या रहमानने ती कामगिरी करून दाखवली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फिरकीपटूकडून बाद होणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे.