Join us  

ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे आत्मविश्वास उंचावलेल्या अफगाणिस्तानचे कडवे आव्हान

श्रीलंकेला सराव सामन्यातही पूर्ण ५० षटके फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या दर्जेदार गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध त्यांना सावधगिरी बाळगावी लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 2:48 AM

Open in App

कार्डिफ : पहिल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध १० गड्यांनी पराभव स्वीकारणाऱ्या श्रीलंका संघाला मंगळवारी अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. श्रीलंका संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मात असलेल्या श्रीलंकाला पहिल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. १९९६ च्या चॅम्पियन श्रीलंका संघाचा डाव प्रथम फलंदाजी करताना १३६ धावांत संपुष्टात आला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (नाबाद ५२) याचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. 

श्रीलंकेला सराव सामन्यातही पूर्ण ५० षटके फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या दर्जेदार गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध त्यांना सावधगिरी बाळगावी लागेल. अन्य फलंदाजांनाही आपली भूमिका बजवावी लागेल. अनुभवी लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांना पाटा खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या उणिवा शोधावी लागेल.

दुसरीकडे अफगाणिस्तान पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला असला तरी त्यांनी २०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. लंकेविरुद्ध फलंदाज चांगली कामगिरी करतील, अशी अशा अफगाण कर्णधार गुलबदन नायबला आहे. गोलंदाजीमध्ये अफगाण क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ राशिद खान, अष्टपैलू मोहम्मद नबी व हामिद हसन यांच्यावर लक्ष असेल.

प्रतिस्पर्धी संघअफगाणिस्तान : गुलबदन नायब (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली जदरान, हजरतुल्लाह जजाई, रहमत शाह, असगर अफगान, हशमतुल्लाह शाहिदी, नजीबुल्लाह जदरान, समीउल्लाह शिनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दौलत जदरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब-उर-रहमान

श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, जीवन मेंडिस, कुसाल मेंडिस, कुसाल परेरा, तिसारा परेरा, नुवान प्रदीप, धनंजय डिसिल्वा, मिलिंदा सिरिवर्धना, लाहिरू तिरिमाने, इसुरू उदाना, जाफरे वांडेरसेदोन्ही संघांदरम्यान २०१४ सालापासून आतापर्यंत केवळ ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी श्रीलंकेने २ ,तर एका सामन्यात अफगाणिस्तानची सरशी झाली आहे.

  • दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत एकच सामना झाला असून तो श्रीलंकेने जिंकला आहे.
  • श्रीलंकेने १९९६ साली विश्वचषक जिंकला आहे.
  • विश्वचषकामध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानविरुद्ध २३६, तर अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध २३२ धावा अशी कामगिरी केली आहे.

 

टॅग्स :श्रीलंकाअफगाणिस्तान