ICC World Cup 2019 : बारा वर्षांनी बेन स्टोक्सच्या हातून घडला चमत्कार, ठरला इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार!

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 10:14 AM2019-05-31T10:14:13+5:302019-05-31T10:14:36+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : After 12 year's Ben Stokes became a first player who have taken 2+ wkts, 2+ catches & scored a 50 in the same World Cup match | ICC World Cup 2019 : बारा वर्षांनी बेन स्टोक्सच्या हातून घडला चमत्कार, ठरला इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार!

ICC World Cup 2019 : बारा वर्षांनी बेन स्टोक्सच्या हातून घडला चमत्कार, ठरला इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला 311 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांची मिशन वर्ल्डकपची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने या सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडला विजय मिळवता आला. या सामन्यात स्टोक्सच्या कामगिरीने 12 वर्षांपूर्वीच्या चमत्काराशी बरोबरी केली.



जेसन रॉय ( 54), जो रूट ( 51), इयॉन मॉर्गन ( 57) आणि बेन स्टोक्स ( 89) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 8 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी'कॉक ( 68) आणि व्हॅन डेर ड्युसन ( 50) वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर ( 3/27), लिएम प्लंकेट ( 2/37) आणि बेन स्टोक्स ( 2/12) यांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे फलंदाज अपयशी ठरले. या सामन्यात स्टोक्सने अफलातून कॅचसह दोन झेल टिपले.  


वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका सामन्यात अर्धशतक, दोन विकेट आणि दोन झेल टीपणारा स्टोक्स हा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी 2007च्या वर्ल्ड कपमध्ये केनियाचा स्टीव्ह टिकोलो ( 72*+2/34+2 झेल) वि. कॅनडा, 2003 मध्ये इंग्लंडचा अँण्ड्य्रू फ्लिंटॉफ (64 + 2/15 + 2 झेल) वि. भारत आणि 1996 मध्ये श्रीलंकेच्या अँटोनी डी'सिल्वा (107* + 3/42 + 2 झेल) वि. ऑस्ट्रेलिया यांनी अशी कामगिरी केली आहे.
 

इंग्लंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेत पहिलाच सामना खेळणाऱ्या आर्चरनेही विक्रमाला गवसणी घातली. ओव्हल मैदानावर वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या गोलंदाजांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी विलिसने 1983च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 9 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. 


 

Web Title: ICC World Cup 2019 : After 12 year's Ben Stokes became a first player who have taken 2+ wkts, 2+ catches & scored a 50 in the same World Cup match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.