लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आपल्या अखेरच्या सामन्यात ख्रिस गेल भावुक झाला होता. विश्वचषकातील अखेरचा सामना जिंकल्यावर गेल आनंदात होता. त्यामुळे या सामन्यानंतर त्याने एक गुपित उलगडले आहे. एका व्हिडीओमध्ये गेलने हे गुपित सांगितलं आहे. हे गुपित नेमकं आहे तरी काय...
पाहा व्हिडीओ...
चाहत्यांबरोबर सेल्फी काढायचा मोह गेलला आवरता आला नाहीआपल्या अखेरच्या सामन्यात ख्रिस गेल भावुक झालेला पाहायला मिळाला. विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात गेलला विजयाची चव चाखता आली. त्याचबरोबर संघाने त्याला एक भेटही दिली. पण यावेळी गेलला चाहत्यांनाबरोबर सेल्फी काढायचा मोह आवरता आला नाही. सामना संपल्यावर आपल्या चाहत्यांना खूष करण्यासाठी गेलले त्यांच्याबरोबर खास सेल्फी काढला.
आयसीसीने गेलसाठी एक खास व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये गेलच्या आतापर्यंतच्या विश्वचषकातील आठवणींना उजाळ देण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये 2003 ते 2019 या विश्वचषकात गेल का लक्षात राहिला, हे दाखवण्यात आले आहे.
पाहा हा खास व्हिडीओ
विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात ख्रिस गेलला दिले ही अविस्मरणीय भेटवेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाजल ख्रिस गेल विश्वचषकातील आज अखेरचा सामना खेळला. वेस्ट इंडिजचा संघाचाही या विश्वचषकातील हा अखेरचा सामना होता. आपल्या अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला आणि गेलचाही विश्वचषकातील शेवट गोड झाला. पण या सामन्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने गेलला एक अविस्मरणीय भेट दिली. ही भेट गेलच्या कायम लक्षात राहील अशीच आहे.
विश्वचषकातील आपला अखेरचा सामना जिंकण्याचे भाग्य गेलच्या नशिबी होते. सामना संपल्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी गेलला मिठी मारली. त्याचबरोबर विजयानंतर सामन्यातील चेंडू गेलला भेट देण्यात आला.
वेस्ट इंडिजने केला शेवट गोड, अफगाणिस्तानचा 'भोपळा' कायमवेस्ट इंडिने आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकाचा शेवट गोड केला. दुसरीकडे अफगाणिस्तानला मात्र गुणांचा भोपळा फोडता आला नाही. कारण अफगाणिस्तानला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या इव्हिन लुईस (58), शे होप (77) आणि निकोलस पुरन (58) यांनी अर्धशतक झळकावल्यामुळे त्यांना तिनशे धावांचा टप्पा गाठता आला. जेसन होल्डरने जलदगतीने 45 धावांची खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला अफगाणिस्तानपुढे 312 धावांचे आव्हान ठेवता आले.
वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला दुसऱ्याच षटकत पहिला धक्का बसला. पण त्यानंतर रहमत शाह (62) आणि इक्राम अलिखील (86) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळेच अफगाणिस्तानने आपले आव्हान कायम ठेवले होते. पण हे दोघे बाद झाल्यावर मात्र अफगाणिस्तानचे फलंदाज मोठा फटके मारण्याच्या नादात बाद होत गेले आणि त्यांना सामना गमवावा लागला.