लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाचा विश्वचषक चांगलाच रंगतदार होत चालला आहे. आज तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एक पराक्रम करत गोलंदाजही कमी नाहीत, हे देखवून दिले. हा पराक्रम करणारा शमीनंतरचा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बोल्टने हा पराक्रम केला. बोल्टने ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले. बोल्टने या सामन्यात हॅट्रिकला गवसणी घातल्याचेही पाहायला मिळाले. अखेरच्या षटकातील सलग तीन चेंडूवर बोल्टने उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क आणि जेसन बर्डनऑफ यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली.
फिंच, वॉर्नर, स्मिथ, मॅक्सवेल नापास; तरीही ऑस्ट्रेलियाला विजयाच्या ध्यास
आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी आतापर्यंतच्या विश्वचषकात धावांच्या राशी उभारल्या होत्या. पण हे दोघेही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फेल झाले. या दोघांबरोबर स्टीव्हन स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलही नापास झाले. पण तरीही ऑस्ट्रेलियाच्या संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. हे ऑस्ट्रेलियाला साध्य झाले ते उस्मान ख्वाजा आणि अॅलेक्स कॅरे यांच्या अर्धशतकांचा जोरावर. ख्वाजा आणि कॅरे यांच्या दमदार खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 243 धावा उभारता आल्या.
न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. अपवाद ख्वाजा आणि कॅरे या दोघांचा. पण या दोघांना वगळता अन्य ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने यावेळी चार बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवातीला हा निर्णय त्यांच्यासाठी चांगला नसल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या षटकापासून ऑस्ट्रेलियाला धक्का बसायला सुरुवात झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची 1 बाद 15 अशी अवस्था होती, पण त्यानंतर त्यांची 5 बाद 92 अशी स्थिती झाली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ दोनशे धावा पण करणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते.
ऑस्ट्रेलियाचे मातब्बर फलंदाज बाद झाल्यावर न्यूझीलंडचा संघ वरचढ होऊ पाहत होता. पण ख्वाजा आणि कॅरे या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाला संकटातून वाचवले. ख्वाजाने पाच चौकारांच्या जोरावर 88 धावा केल्या. कॅरेने 11 चौकारांच्या जोरावर 71 धावांची खेळी साकारली.
Web Title: ICC World Cup 2019: after Mohammed Shami Trent Boult claimed the second hat-trick of the World Cup 2019
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.