नवी दिल्ली, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील पराभव चाहत्यांसह साऱ्यांनाच चांगला जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आपण या पराभवासाठी कुठे ना कुठे तरी जबाबदार होतो, याची जाणीव निवड समिती अध्यक्षांना झाली आहे. त्यामुळेच विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांना राजीनामा दिला आहे.
प्रत्येक स्पर्धेसाठी निवड समिती संघाची बांधणी करत असतो. विश्वचषक ही मानाची स्पर्धा समजली जाते. जी प्रत्येक चार वर्षांनी खेळवली जाते. विश्वचषकासाठीही निवड समितीने पंधरा सदस्यीय संघ निवडला होता. पण आपण निवडलेला संघ विश्वचषकात पराभूत झाला, ही गोष्ट निवड समिती अध्यक्षांच्या मनाला बोचत आहे. त्यामुळेच त्यांनी निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
धोनीही 'रिटायर' होणार, पण त्याआधी टीम इंडियासाठी मोठं काम करणार!वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेच चर्चेचा विषय ठरले आहेत. कोहलीच्या नेतृत्वावर, तर धोनीच्या स्पर्धेतील कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याची आणि धोनीनं निवृत्ती स्वीकारायची मागणी होत आहे. आगामी वेस्ट इंडिज मालिकेत धोनीचा संघात समावेश करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विंडीज दौऱ्यावर जात नसला तरी धोनी निवृत्ती घेईल असे नाही, तर त्याच्याकडे एक नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
भारताला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघात मोठे बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानला तर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही पोहोचता आले नव्हते. त्यामुळे पाकिस्तानचे निवड समिती अध्यक्ष आणि माजी कर्णधार इंझमाम उल हकने राजीनामा देण्याचे ठरवले आहे. इंझमामने एक पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेमध्ये इंझमामने ही घोषणा केली आहे.
इंझमाम म्हणाला की, " क्रिकेट हे माझे वेड आहे. त्याचबरोबर क्रिकेटसाठी मी काहीही करू शकतो. माझ्या अध्यक्षतेखाली विश्वचषकातील संघ निवडला गेला होता. विश्वचषकातील संघाच्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आम्ही विश्वचषकात चांगला खेळ केला. पण नशिबाची साथ नसल्यामुळे आम्हाला उपांत्य फेरीत पोहोचता आले नाही."