मुंबई : आतापर्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची विश्वचषकाच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये अजिंक्यला मर्यादित षटकांच्या सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले होते. पण इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्ट्या पाहता अजिंक्यला विश्वचषकाच्या संघात संधी मिळेल, असे काही जणांना वाटत होते. पण रहाणेला विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.
30 वर्षीय रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा दाखवून दिला आहे, परंतु मर्यादित षटकांच्या सामन्यांत त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय संघ चौथ्या क्रमांकासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे या स्पर्धेत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून संघात कमबॅक करण्याचा रहाणेचा प्रयत्न आहे. रहाणेने 90 वन डे सामन्यांत 35.26 च्या सरासरीनं 2962 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय संघाला गरज पडली तेव्हा त्यानं सलामी आणि मधल्या फळीची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो.
यापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये अजिंक्य काही गोष्टी म्हणाला होता. ''वर्ल्ड कप स्पर्धेत संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य आहे. मग आयपीएल असो किंवा अन्य स्पर्धा त्यात धमाकेदार कामगिरी करण्याचे ध्येय आहे. सातत्याने धावा करून संघासाठी दर्जेदार कामगिरी तुम्हाला करावी लागते. सध्याच्या घडीला मी राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करत आहे आणि वर्ल्ड कपसाठी आणखी बराच वेळ आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर वर्ल्ड कपमध्ये संधी चालून येईल,'' असे अजिंक्यने सांगितले होते. पण आयपीएलमध्येही रहाणेला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले नसल्याचे म्हटले जात आहे.
यापूर्वी अजिंक्यने विश्वचषकाच्या संघाबद्दल काय म्हटले होते ते वाचा....
अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघात एक बदल पाहायला मिळेल, असे सूचक विधान कर्णधार विराट कोहलीनं केलं होतं. ऑसींविरुद्धच्या मालिकेत भारताला मधल्या फळीसाठी भक्कम पर्याय शोधण्यास अपयश आले. चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कोहलीच्या विधानानंतर अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळायला हवे, असे मत काही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यात रहाणेनेही वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) धमाकेदार कामगिरी करण्याचा निर्धारही त्यानं बोलून दाखवला होता.
मी आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये नक्की खेळणार- अजिंक्य रहाणे
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोघेही संघात असताना अजिंक्य रहाणे कधीही ‘पोस्टर बॉय’ बनू शकला नाही. मात्र, टीम इंडियाला ज्या फलंदाजांनी पुढे नेले, त्यात अजिंक्यच्या नावाचा उल्लेख जरूर होईल. जसे सचिनच्या काळात राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीचे स्थान होते, तसेच आता अजिंक्यचेही आहे. तो कसोटी क्रिकेटचा आत्मा तर आहे. कारण जोहान्सबर्गपासून लॉर्ड्सपर्यंत त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत शतके झळकाविली आहेत. विंडिजमध्ये चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके आणि गेल्या दोन वर्षांत टी२० क्रिकेटमध्ये ३ शतके झळकाविल्यानंतरही अजिंक्य भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघात नाही. मात्र, त्याला विश्वचषक संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे. अजिंक्यने मुश्ताक अली क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान इंदूर येथे केलेली खास बातचीत.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप पाडल्यानंतरही तू भारताच्या संघात नाहीस?
होय, माझी निवड करणे किंवा न करणे हे निवडकर्त्यांचे काम आहे. जेव्हा कधी मला राष्ट्रीय संघात संधी मिळते, तेव्हा पूर्ण ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी पुढचा विचार करतो. मला विश्वास आहे की, मी विश्वचषक संघात असेन.
Web Title: ICC World Cup 2019: Ajinkya Rahane has been dropped from the World Cup team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.