Join us  

ICC World Cup 2019: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलिया शाकिबपासून राहणार सावध

पाचवेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया गुरुवारी बांगलादेशविरुद्ध विजयी मोहीम कायम राखून उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करणार यात शंका नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:00 AM

Open in App

नॉटिंगहॅम : पाचवेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया गुरुवारी बांगलादेशविरुद्ध विजयी मोहीम कायम राखून उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करणार यात शंका नाही. तथापि, शाकिब अल हसनपासून त्यांना सावध राहावेच लागेल. अ‍ॅरोन फिंचच्या संघाचे इंग्लंडच्या बरोबरीने पाच सामन्यात सारखे आठ गुण असले, तरी धाव सरासरीच्या आधारे हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पाचपैकी केवळ भारताविरुद्ध त्यांनी सामना गमावला.कर्णधार मुशर्रफ मूतर्झा याच्या बांगलादेश संघानेही सध्याच्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी विजयाची नोंद करायची झाल्यास, खेळाडूंना सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करावी लागेल. आॅस्ट्रेलियाच्या जमेची बाब अशी की, स्टोइनिस दुखापतीतून सावरला असून तो बांगलादेशविरुद्ध खेळू शकतो. मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचा वेगवान मारा प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असून, फलंदाजीत अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासह मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथ हे सर्वोत्तम फलंदाज आहेत.बांगलादेशने पाचपैकी दोन सामने जिंकले आणि दोन गमावले. न्यूझीलंडविरुद्ध सामना त्यांनी काठावर गमावला होता. सोमवारी विंडीजविरुद्ध ३२२ धावांचे लक्ष्य बांगलादेशने सहज गाठले. आॅसीविरुद्ध त्यांना याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. अष्टपैलू शाकिब अल हसनने सामन्यात नाबाद १२४ धावा चोपल्या. शाकिब फॉर्ममध्ये असून त्याने सलग दोन शतके ठोकली आहेत. दोन वर्षांआधी बांगलादेशने आॅस्ट्रेलियाविरुद्ध १० गड्यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी विजयात शाकिबची मोठी भूमिका होती. एकदिवसीय सामन्यांतही त्याला रोखणे आवश्यक असल्याची कबुली आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँंगर यांनी दिली. या सामन्यातही तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)हेड-टू-हेडदोन्ही संघांदरम्यान सन १९९० पासून २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी आॅस्ट्रेलियाने १८ सामने, तर बांगलादेशने केवळ १ सामना जिंकला आहे. याशिवाय १ सामना अनिर्णित राहिला आहे.दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतींमधील ४ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला.दोन्ही संघ विश्वचषकात तीनवेळा आमनेसामने आले असून यातील दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली असून एका सामन्यात कोणताही निकाल लागलेला नाही.विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध १८१, तर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७८ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.ऑस्ट्रेलियाची बांगलादेशविरुद्ध १०६ धावांची नीचांकी खेळी असून बांगलादेशची नीचांकी धावसंख्या १०४ आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019आॅस्ट्रेलियाबांगलादेश