लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : एकेकाळी 4 बाद 38 अशी परिस्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भन्नाट पुनरागमन केले. स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कल्टर निल यांनी दमदार खेळी साकारत ऑस्ट्रेलियाला तारले. त्यामुळे त्यांना वेस्ट इंडिजपुढे 289 धावांचे आव्हान ठेवता आले. कल्टर निलचे शतक यावेळी फक्त आठ धावांनी हुकले. कल्टर निलने 60 चेंडूंत 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 92 धावा फटकावल्या.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हा निर्णय योग्य असल्याचे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरुवातीला दाखवून दिले. कारण फक्त 38 धावांमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल आणि उस्मान ख्वाजा यांना गमावले. पण त्यानंतर स्टीव्हन स्मिथने नांगर टाकत संघाची पडझड थांबवली.
स्मिथने यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीबरोबर (45) सहाव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर स्मिथ आणि कल्टन निल यांची जोडी तर चांगलीच जमली. पण शेल्डन कॉट्रेलने अप्रतिम झेल पकडत स्मिथला बाद केले. स्मिथने सात चौकारांच्या जोरावर 73 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.
स्मिथ बाद झाल्यावरही कल्टर निलने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या फुगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यावेळी कॉल्टर निल हा स्मिथपेक्षा आक्रमक खेळत असल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजकडून शाई होप आणि कॉट्रेल यांच्याकडून अप्रतिम झेल पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिजचा 'हा' गोलंदाज का ठोकतो विकेट मिळाल्यावर सलाम
प्रत्येकाची सेलिब्रेशन करण्याची एक वेगळी स्टाइल असते. क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या अनोख्या स्टाइल पाहायला मिळतात. वेस्ट इंडिजच्या संघाने भारतामध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकल्यावर भन्नाट चॅम्पियन्स डान्स केला होता. आता इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात सलाम करून सेलिब्रेशन करण्याची त्यांची पद्धत अनोखी अशीच आहे.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल हा विकेट मिळाल्यावर सलाम ठोकत सेलिब्रेशन करतो. हे साऱ्यांनीच पाहिले आहे. पण तो असे सेलिब्रेशन का करतो, हे तुम्हाला माहिती नसेल. पण या प्रश्नाचे उत्तम वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी दिले आहे.
बिशप म्हणाले की, " कॉट्रेल हा जमैकाच्या संरक्षण विभागात आहे. त्यामुळे विकेट मिळवल्यावर कॉट्रेल सलाम ठोकतो तो त्याच्या संरक्षण दलातील सहकाऱ्यांसाठी असतो. कारण कॉट्रेल आनंद साजरा करत असताना त्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न करतो. "
हा पाहा खास व्हिडीओ
वेस्ट इंडिच्या विकेटकिपरची अफलातून कॅच, फलंदाजही पाहून झाला हैराण
आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा विकेटकिपर शाई होपने घेतलेल्या कॅचची चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरु आहे. होपने या सामन्यात आतापर्यंत तीन कॅच घेतले आहेत. यापैकी सुपर कॅच नेमकी कोणती, ते जाणून घ्या.
या सामन्यात होपने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाची जी कॅच पकडली, ती अफलातून अशीच होती. आंद्रे रसेलच्या सातव्या षटकात ख्वाजाच्या बॅटची कडा घेऊन चेंडू पहिल्य स्लीपच्या दिशेने जात होता. त्यावेळी होपने हवेत उडी मारत ही दमदार कॅच पकडली.
हा पाहा व्हिडीओ
Web Title: ICC World Cup 2019: Australia's solid come back; given 289 runs target to West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.