Join us  

ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा बांगलादेशचा इरादा

मी वर्षानुवर्षे बांगलादेशला खेळताना पाहतो, तेव्हा एक लक्षात आले की हा संघ चॅम्पियन बनण्याच्या दिशेने अंतिम आणि ठोस पाऊल टाकण्याऐवजी सध्याच्या कामगिरीवरच समाधानी दिसतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 1:52 AM

Open in App

- हर्षा भोगले मी वर्षानुवर्षे बांगलादेशला खेळताना पाहतो, तेव्हा एक लक्षात आले की हा संघ चॅम्पियन बनण्याच्या दिशेने अंतिम आणि ठोस पाऊल टाकण्याऐवजी सध्याच्या कामगिरीवरच समाधानी दिसतो. वेस्ट इंडिजविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र या संघाने प्रभावित केले. संघ नियंत्रणात खेळला. त्यांचे खेळावर वर्चस्व होते. आखूड टप्प्याचे चेंडू आमच्यावर दडपण आणू शकत नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले. शाकिब अल हसन हा तर विश्व दर्जाचा खेळाडू. पण लिट्टन दास याने राखीव बाकावरची ताकद सिद्ध करीत उत्कृष्ट खेळी केली.आता बांगलादेशचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. ऑस्ट्रेलिया विंडीजच्या तुलनेत कैकपटींनी बलाढ्य आहे, हे बांगलादेशने समजून घ्यावे. त्यांच्यापुढे डोके वापरून गोलंदाजी करा. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे त्यांचे वेगवान गोलंदाज फॉर्ममध्ये नसल्याने प्रतिस्पर्धी संघही थोडा संघर्ष करीत आहेच. स्टोइनिस जखमी असल्याने पर्याय म्हणून एक अतिरिक्त फलंदाज खेळवून दहा षटके गोलंदाजीची जबाबदारी ग्लेन मॅक्सवेल याच्यावर सोपविण्यात येत आहे. नेमका याच गोष्टीचा लाभ बांगलादेश घेऊ शकतो.ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य देखील बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढणे हेच असावे. बांगलादेशचे गोलंदाज कमकुवत वाटतात. टाँटनसारखी खेळपट्टी मिळाल्यास, मात्र मुस्तफिजूरसह संघातील फिरकी गोलंदाज प्रभावी मारा करू शकतात. पण नॉटिंगहॅम येथे ही अपेक्षा कमीच असेल. येथे पावसाने हजेरी न लावल्यास धावांचा पाऊस पडू शकतो. बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडे जिंकण्याची अनेक शस्त्रे असतील. पण स्वत:वरील विश्वास विजयासाठी आवश्यक ठरतो. द. आफ्रिका आणि विंडीजला धूळ चारणाऱ्या बांगलादेशने आत्मविश्वासाच्या बळावर खेळाची पुनरावृत्ती केल्यास ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजयाची नोंद नक्की शक्य आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019आॅस्ट्रेलियाबांगलादेश