ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; डेल स्टेन विश्वचषकाला मुकणार

ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटरवर खात्यावर दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 05:06 PM2019-06-04T17:06:09+5:302019-06-04T17:08:12+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Big blow to South Africa; Dale Steyn missed the World Cup | ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; डेल स्टेन विश्वचषकाला मुकणार

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; डेल स्टेन विश्वचषकाला मुकणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील दोन सामन्यांच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा अजूनही फिट न झाल्यामुळे त्याला विश्वचषकाला  मुकावे लागणार आहे. ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटरवर खात्यावर दिली आहे. स्टेनच्या जागी ब्युरन हेंड्रीक्सला संघात स्थान देण्यात येणार आहे.


 

डेल स्टेनला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. स्टेन आरसीबीकडून आयपीएमध्ये खेळत होता. त्यावेळी 25 एप्रिलला स्टेन हा जायबंदी असल्याची बाब पुढे आली होती. स्टेनच्या उजव्या खांद्याला मार लागला होता. त्यानंतर स्टेनने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होती. ़पण आता दुखापतीमुळे स्टेनला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेला मुकावे लागण्याची वेळ आली आहे. 

आतापर्यंत विश्वचषकातील दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या सामन्यात तर त्यांना बांगलादेशने पराभूत करत मोठा धक्का दिला होता. त्यामुळे आता जर स्टेन संघात नसेल तर त्यांचे काय होईल, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.

सलग पराभवानंतर आफ्रिकेला आणखी एक धक्का, भारताविरुद्ध 'हा' गोलंदाज खेळणार नाही

दक्षिण आफ्रिका संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. नावाजलेले फलंदाज व गोलंदाज संघात असूनही आफ्रिकेला हार मानावी लागल्यानं क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आफ्रिकेचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे आणि यापूर्वी एकदाच त्यांना अशा नामुष्कीचा सामना करावा लागला होता. पराभवाचे सत्र सुरु असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडीला दुखापतीमुळे आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात डाव्या पायूचे स्नायू ताणले गेल्यानं एनगिडीनं चार षटकांनंतर मैदान सोडले. त्यानंतर तो पुन्हा गोलंदाजी करायला आला नाही. त्याचा फटका आफ्रिकेला बसला आणि बांगलादेशने 330 धावा चोपून काढल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला 309 धावाच करता आल्या आणि त्यांना 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. याआधी सलामीच्या लढतीत त्यांना यजमान इंग्लंडकडून हार पत्करावा लागला होता. या दोन्ही सामन्यांत संघातील प्रमुख गोलंदाज डेल स्टेन खेळला नव्हता, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याला खेळावे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना करणार आहे. बुधवारी होणाऱ्या या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड आहे. त्यात एनगिडीच्या दुखापतीमुळे आफ्रिकेची डोकेदुखी वाढवली आहे. सलामीवीर हाशिम अमला या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे बांगलादेशविरुद्ध तो खेळला नव्हता.

Web Title: ICC World Cup 2019: Big blow to South Africa; Dale Steyn missed the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.