लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. या विजयात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचे मोठे श्रेय आहे. पण पाकिस्तानच्या १०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने झळकावलेले अर्धशतकही महत्वाचे ठरले. या अर्धशतकासह गेलने विश्वचषकात इतिहास रचला आहे.
गेलने या सामन्यात ३४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी साकारली. या खेळीसह गेलने एक विक्रम रचला आहे. या सामन्यापूर्वी गेल आणि एबी डिविलियर्स हे दोघे विश्वचषकात ३७ षटकार ठोकणारे अव्वल फलंदाज होते. विश्वचषकातील सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये हे दोघे संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. पण या सामन्यात तीन षटाक लगावत गेलने एबी डिविलियर्सला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे.
पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा डब्बा गुल, वेस्ट इंडिजचा सहज विजयविश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 105 धावांच सर्वबाद केले. त्यानंतर ख्रिस गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी हे आव्हान सात विकेट्स आणि २१८ चेंडू राखून पूर्ण केले.
पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानचा 105 धावांत खुर्दा उडवला. पाकिस्तानच्या फक्त चार फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या उभारता आली.
नॉटिंगहॅमच्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण ठरले. वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे सामन्याच्या सुरुवातीपासूनच दाखवून दिले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवले.
तिसऱ्याच षटकात इमाम उल हकच्या रुपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमान आणि बाबर आझम यांनी प्रत्येकी २२ धावा करत संघाला सारवण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये ते अपयशी ठरले. आंद्रे रसेलने फखर झमानला क्लीन बोल्ड करत ही जोडी फोडली आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला.